पंढरपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा महासंघाच्या वतीने उद्या सोमवारी 'पंढरपूर बंद' ची हाक देण्यात आली असून व्यापारी बंधूनी सहकार्य करावे असे आवाहन महासंघाचे अर्जुन चव्हाण यांनी केले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मराठा समाजाची जुनीच मागणी असून यासाठी राज्यातून मराठा समाजाने अत्यंत शांततेने परंतु अति विराट आणि अभूतपूर्व असे ५२ मोर्चे काढले. राज्य शासनाने दिलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. मराठा समाज अजूनही आरक्षणाची मागणी करीत असून खा. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी उपोषण सुरु केले आहे. राजेना उपोषणास बसावे लागल्यामुळे मराठा समाज अस्वस्थ आहे. तसे पडसाद राज्यात उमटू लागले असून पंढरीत उद्या बंद ची हाक देण्यात आली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजाच्या अनेक तरुणांनी बलिदान दिले आहे. आझाद मैदानात छत्रपती संभाजी राजे उपोषणास बसले आहेत. मराठा समाजाच्या अनेक मागण्या असल्या तरी कुठल्याच शासनाने त्या पूर्ण केल्या नाहीत, सरकारने फसवणूकच केली आहे, या उपोषणास पाठींबा आणि मराठा आरक्षणाची मागणी यासाठी उद्या सोमवारी २८ फेब्रुवारी रोजी पंढरपूर बंद ची हाक दिली असल्याचे अर्जुन चव्हाण यांनी सांगितले. शहरातील सर्व व्यापारी, व्यापारी संघटना तसेच अन्य संघटनांनी 'पंढरपूर बंद' मध्ये सहभागी व्हावे आणि सहक्र्य करावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !