BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० ऑग, २०२२

देवेंद्र फडणवीस यांचा 'तो' व्हिडीओ प्रचंड व्हायरल !

 



राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उप मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल होऊ लागला असून तो पाहणाऱ्यांची संख्याही वाढत चालली असल्याचे दिसत आहे. 


महाविकास आघाडीकडून भारतीय जनता पक्षाला 'वॉशिंग मशीन" म्हणून नेहमीच हिणवण्यात येते. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर मोठमोठ्या भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने केले आणि तेच नेते भाजपात दाखल झाले की त्यांच्या कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा बाजूला पडल्याची अनेक उदाहरणे गेल्या वर्षांत समोर आली आहेत.  भाजपचे किरीट सोमय्या यांनी देखील अनेक नेत्यांच्या भ्रष्टाचारावर प्रहार करीत आरोप केले आणि येत्या काही दिवसात हे नेते तुरुंगात जाणार असल्याचे सांगितले. आरोप असलेले हेच नेते भारतीय जनता पक्षात गेले आणि त्यांच्यासाठी तुरुंगाचे दरवाजे बंद झाले. कितीही आरोप असले तरी भाजपत गेले की पवित्र होते अशी अनके उदाहरणे महाराष्ट्राने पाहिली आहेत. ईडी, सीबीआय, आयकर अशा यंत्रणांचा वापर करून शिवसेना फोडल्याचे आरोप तर अलीकडेच झाले आहेत आणि होतही आहेत.


शिंदे फडणवीस सरकारचा शपथ विधी झाला आणि वादाला मोठे तोंड फुटले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले संजय राठोड यांचा राजीनामा शिवसेनेने घेतला होता. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. भारतीय जनता पक्षाने आणि विशेषतः त्यावेळचे विरोधी पक्ष नेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना धारेवर धरले होते. भाजपच्या आक्रमक होण्यामुळेच संजय राठोड याना राजीनामा द्यावा लागला होता पण आता शिंदे गट आणि भाजपचे सरकार आल्यानंतर त्याच संजय राठोड याना थेट कॅबिनेट मंत्री बनवले गेले आहे. (
Devendra Fadnavis' video is very viral) त्यामुळे भाजप टीकेचे धनी बनले आहे. सर्वसामान्य नागरिकही या घटनेकडे आश्चर्याने पाहू लागला असून भाजप यामुळे पुन्हा एकदा बॅकफूटवर जाताना दिसत आहे. 


भाजपच्याच नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड याना मंत्रीपद देणे हे दुर्दैवी असल्याचे सांगत त्यांच्याविरोधातला आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचे म्हटले आहे. ज्या भाजपने संजय राठोड यांच्यावर जोरदार प्रहार केले त्याच राठोड याना आता पवित्र करून घेतले गेले आहे त्यामुळे समाज माध्यमांवर तर भाजपवर जोरदार हल्ला होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनीच महाविकास आघाडीत मंत्री असलेल्या संजय राठोड यांचा राजीनामा मागितला होता आणि आता त्यांच्याच मंत्रिमंडळात राठोड यांचा कॅबिनेट मंत्रीपदी समावेश झाला आहे. ही विसंगती सामान्य माणसाला देखील जोरदार खटकली असून यामुळे भाजपची कोंडी होताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दोन वेळा संजय राठोड यांच्यावर भाष्य केले असून त्यांना क्लीन चीट मिळाल्यामुळे त्यांचा मंत्रीमंडळात समावेश झाला असल्याचे म्हटले आहे. 


संजय राठोड यांना मंत्रीमंडळात घेण्याबाबत भाजप अनुकूल नव्हते असे देखील आता समोर येवू लागले आहे त्यामुळे भाजपच्या मनाविरुद्ध हा निर्णय झाला आहे काय ? असा देखील प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी भाजप आणि फडणवीस यांनी संजय राठोड यांच्या विरोधात रान पेटवले होते आणि आता  मात्र राठोड हे भाजपच्या  मांडीला मांडी लावून ते बसू लागले आहेत त्यामुळे भाजपात देखील अस्वस्थता असून भाजपच्या प्रतिमेला धक्का लागू लागला आहे. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी केलेल्या आक्रमक भाषणाचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून तेवढ्याच संख्येने तो पाहिला देखील जात आहे.   

दरम्यान नव्याने मंत्रीपदाची शपथ घेतलेले संजय राठोड हे अधिकच अडचणीत येत असून महाविकास आघाडीकडून त्यांना धारेवर धरले जात आहे. सुरुवातीला राठोड यांचे नाव मंत्रीपदाच्या यादीतून वगळण्यात आले होते परंतु नाराजीच्या कारणास्तव त्यांचे नाव ऐनवेळी यादीत समाविष्ट झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे सरकारचा विस्तार होताच हे नाव सरकार आणि भाजपसाठीसुद्धा डोकेदुखी ठरू लागले आहे. दुसरे मंत्री अब्दुल सत्तार यांनी कितीही खुलासे केले असले तरी शिवसेनेकडून त्यानाही टार्गेट केले जाऊ लागले आहे. शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा पुढील काळात सत्तार यांच्या नावानेच गाजण्याचे संकेत मिळू लागले आहेत.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !