BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ फेब्रु, २०२२

युक्रेनमध्ये तिरंगी झेंड्याने केली भारतीयांची मदत !

 



शोध न्यूज : युक्रेन - रशिया यांच्या युद्ध सुरु असले तरी तेथील भारतीयांना तिरंगी झेंडा मदत करीत असून केवळ भारतीय तिरंगा पहिला तरी तेथील सैनिक सन्मान करताना दिसत आहेत. 


भारतीय नागरिकांना आपल्या देशाचा तिरंगा नेहमीच अभिमानाचा राहिला आहे. तिरंगी झेंडा पहिला की भारतीयांची छाती फुगते आणि देशप्रेमाचा एक आगळावेगळा हुंकार काळजातून उफाळून येतो. हाच तिरंगा आता युद्धाच्या कठीण परिस्थितीत देखील युक्रेनमध्ये भारतीयांची मदत करीत आहे आणि भारतीयांना मायदेशी येण्यासाठी हा तिरंगाच सोबत करीत आहे. अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडलेले आहेत. युद्धाची परिस्थिती निर्माण होत असल्याचा अंदाज भारतीय विद्यार्थ्यांना आला होता आणि त्यांनी भारतात परत येण्याची तयारीही केली होती पण तेवढ्यात तेथील विमान सेवा बंद झाली आणि भारतीय अडकून पडले. 


युद्धाची कठीण परिस्थिती निर्माण झाल्याने मोठे संकट युक्रेनच्या क्षितिजावर असतानाही भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीला तिरंगा झेंडा धावून आला आहे. भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात येत आहे. युक्रेनमधून दुसऱ्या देशाच्या सीमेपर्यंत विद्यार्थ्यांना पोहोच करण्यासाठी जी वाहने वापरली जात आहेत त्या वाहनांवर भारताचा तिरंगा लावला जात आहे आणि तिरंगा पाहताच सैनिक सन्मान करीत या वाहनांना पुढे पाठवत आहेत. वाहनावरील भारतीय तिरंगा पाहून सैनिकाकडून सन्मान करीत असल्याची माहिती युक्रेनमधून मायदेशी पोहोचलेल्या विद्यार्थ्याकडून सांगण्यात येत आहे.  


भारतीय विद्यार्थी जात असलेल्या वाहनावर तिरंगा लावला असेल तर या विद्यार्थ्यांची सुरक्षा करण्याची जबाबदारी आमची आहे असे रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी म्हटले होते. भारतीय विद्यार्थ्यांना देशाच्या सीमेवर पोहोच करण्याचे काम रशियन सैनिक करतील असे देखील पुतीन यांनी सांगितल्याचे म्हटले जात आहे. भारतीयांना मात्र सुरक्षितपणे सीमेवर पोहोचवले जात आहे अशी माहिती देखील मायदेशी परलेल्या विद्यार्थ्यांकडून सांगितले जात आहे.    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !