BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ फेब्रु, २०२२

बाल गुन्हेगाराने चोरल्या तबब्ल अडीच लाखांच्या सायकल !



सोलापूर : एका बाल गुन्हेगाराने तब्बल अडीच लाखांच्या ४३ सायकल्स चोरल्या असल्याचे प्रकरण वळसंग पोलिसांनी उघडकीस आणले असून या चोऱ्यांचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 


मोटार सायकलची चोरी होणे आणि त्यातील आरोपी सापडणे ही अलीकडे नित्याची बाब झाली आहे पण चक्क सायकल चोरणारा एक बाल गुन्हेगार प्रकाशात आला असून त्याला मदत करणारे देखील दोघे अल्पवयीनच आहेत ही आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.  कुंभारी येथील विडी घरकुल येथे राहणाऱ्या श्रीमती लक्ष्मी मुकुंद अंकम यांची सायकल चोरीला गेली होती. या सायकल चोरीची फिर्याद त्यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी या चोरीचा तपास सुरु केला आणि त्यांना ही धक्कादायक माहिती मिळाली. या महिलेच्या परिसरात राहणारा एक अल्पवयीन बालक सायकल चोरी करून इतरांना विकत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आणि पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. 


अल्पवयीन मुलाकडे पोलिसांनी सायकल चोरीची चौकशी सुरु केली तेंव्हा त्याने सुरुवातीला पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली आणि आपण 'त्या गावाचे नाहीच' अशी भूमिका घेतली. पोलिसांना मात्र गोपनीयरित्या खात्रीशीर माहिती मिळाली होती त्यामुळे त्यांनी अधिक खोलात जावून चौकशी केली तेंव्हा या बालकाने आपण ४३ सायकल चोरल्या असल्याची कबुली दिली. सोलापूर शहर आणि परिसरात या चोऱ्या केल्याचे त्याने कबूल केले. त्यानंतर त्याला विश्वासात घेतले असता त्याने या कामात आपल्याला मदत करणारे आणखी दोघे जण असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे हे दोघेही अल्पवयीन आहेत. त्यांनी चोरलेल्या ४३ सायकल्सची किंमत अडीच लाख रुपयांची आहे.   


एक हजारात सायकल 

हा बाल गुन्हेगार सायकल चोरण्यासाठी रेंजर सायकलला महत्व देत असायचा. महाविद्यालयात शिकणारी मुले रेंजर सायकलला प्राधान्य देतात त्यामुळे रेजर सायकल दिसली की ती चोरायची आणि पाच हजार रुपये किमतीची सायकल केवळ एक हजारात विकायची असा प्रकार केला जात असल्याचे पोलिसांना या तपासात आढळून आले आहे. लहान वयात एवढ्या मोठ्या प्रमाणात केल्या गेलेल्या चोऱ्या पाहून अनेकांचे डोळे विस्फारले आहेत.      

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !