शोध न्यूज : अंगावरील हळद निघण्याआधीच नव्या नवरीने आपल्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून पती आवडत नसल्याच्या कारणावरून ही घटना घडली आहे.
अनैतिक कारणावरून पतीने पत्नीची हत्या केल्याचा अनेक घटना समोर येतात तशा पत्नीकडून देखील आपल्या पतीचा काटा काढण्याच्या काही घटना घडल्या आहेत. बीड येथील घटना मात्र इतर घटनापेक्षा वेगळी असून केवळ पती पसंत नाही म्हणून थंड डोक्याने पतीचा खून नव्या नवरीनेच केला असल्याची अत्यंत धक्कादायक बाब प्रकाशात आली आहे. लग्न म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात समजली जाते आणि नव्या जीवनाची स्वप्ने रंगविण्याचा हा काळ असतो. पांडुरंग चव्हाण या २२ वर्षे तरुणाच्या बाबतीत वेगळेच घडले. लग्न होऊन केवळ २२ दिवस झाले होते, अजून अंगावरील हळद पूर्णपणे निघालेली नव्हती पण जिल्हा आयुष्याचा जोडीदार म्हणून घरात आणले तिनेच पांडुरंगचा जीव घेतला आणि नव्या जीवनाचा प्रारंभ सुरु होण्याच्या आधीच जीवनाचा शेवट झाला.
गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील पांडुरंग चव्हाण या तरुणाचा विवाह शीतलसोबत १४ ऑक्टोबर रोजीच झाला होता. पौळाची वाडी येथे आनंदी वातावरणात हा विवाह संपन्न झाला. चव्हाण यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण होते पण नवरदेव पांडुरंग याच्यापुढे मात्र नवे संकट उभे राहिले होते. लग्न धुमधडाक्यात आणि आनंदात झाले पण नवरी मुलगी घरी येताच काही वेगळेच नाट्य सुरु झाले. नवरा मुलगा आपल्याला आवडत नाही असा सूर या नव्या नवरीने आळवायला सुरुवात केली. मुलगा आपल्याला पसंत नाही, तो आपल्याला आवडत नाही असे म्हणत शीतलने घरात भांडण सुरु केले. हे भांडण सतत सुरु राहिले. अंगावरील हळद निघण्यापूर्वी आणि लग्नाचा आनंद ओसरण्यापुर्वी चव्हाण कुटुंबावर हे वेगळेच संकट घोंगाऊ लागले.
काहीतरी मार्ग निघेल, नवरी मुलीची समजूत काढता येईल असे वाटत असतानाच या कुटुंबात एक काळरात्र आली. पांडुरंग आणि शीतल हे दोघेही रात्री आपल्या खोलीत झोपले असताना शीतल घाईगडबडीने बाहेर आली आणि'सासू सासऱ्याला काही सांगू लागली. 'पती पांडुरंग यांचे शरीर थंड पडले आहे' असे तिने सांगितले आणि सगळेच घाबरून गेले. पांडुरंग यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले परंतु तेथे गेल्यावर डॉक्टरांनी पांडुरंग यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तरुण मुलगा लग्नाच्या बावीस दिवसानंतर गेल्याने कुटुंब हादरून गेले होते पण त्यांचा संशय आपल्या सुनेवर होता. पांडुरंगच्या आई वडिलांनी थेट सुनेवर आरोप करीत तिनेच आपल्या मुलाला मारले असल्याचा आरोप केला आणि पोलिसात तशी तक्रार देखील दाखल केली.
या घटनेचा तपास सुरु केला आणि सहा दिवसात पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागले. पत्नी शीतल हिनेच आपल्या नव्या नवऱ्याला गळा दाबून मारले असल्याचे तपासात समोर आले. पती पांडुरंग हे झोपलेले असताना पत्नी शीतल हिने त्यांचा गळा दाबून मारून टाकले आणि नंतर कांगावा केला. केवळ पती आपल्याला पसंत नाही म्हणून तिने आपल्या पतीचा २२ दिवसात जीव घेतला असल्याचे समोर आले. (A few days after the marriage, the wife killed her husband) पोलिसांनी शीतलच्या विरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. विश्वास ठेवायचा तरी कुणावर ? हा प्रश्न या घटनेने पुन्हा निर्माण केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !