BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ ऑक्टो, २०२२

मुलाच्या मृत्युच्या धक्क्याने पित्यानेही सोडले प्राण !

 


शोध न्यूज : मुलाचा मृत्यू झाल्याचे कळताच पित्याला जोराचा धक्का बसला आणि हा धक्का सहन न झाल्याने पित्याने देखील आपला प्राण सोडला असल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. 


माता पित्यांचे आपल्या मुलांवर किती प्रेम असते हे दाखविणाऱ्या अगणित घटना या आधीची समोर आल्या आहेत. मुलावरील आईचे प्रेम हे सतत व्यक्त होताना दिसते पण बापाचे मुके प्रेम सहसा दिसून येत नाही. उलट वडिलांची शिस्त ही मुलांना नकोशी वाटत असते आणि आपल्या पित्याचे आपल्यावर प्रेम नसल्याची भावना अनेक मुलांची असल्याचे दिसत असते. पिता देखील आपल्या मुलावर प्रचंड प्रेम करीत असतो परंतु हे प्रेम अव्यक्त असते. आपल्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू होणे ही कल्पनाही पित्यासाठी असह्य असते आणि असाच प्रकार घडल्याने पित्याने आक्रोश करण्यापूर्वीच आपला प्राण सोडला. लोक केवळ हळहळ करीत राहिले. 


विरारमध्ये मनीष जैन हा रात्रीच्या सुमारास इमारतीच्या आवारात गरबा खेळत होता. आनंदाने गरबा खेळता खेळताच त्याला हृदयविकाराचा झटका आला. या धक्क्यामुळे तो खाली कोसळला, त्याच्या वडिलांसह अन्य काही जणांनी मनीषला ताताडीने रुग्णालयात नेले परंतु तेथे जाण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. उपचारापूर्वीच मनीषचा मृत्यू झाल्याचे कानावर पडताच वडील नरपत जैन यांना त्याच क्षणी हृदयविकाराचा झटका आला आणि ते तेथेच कोसळले. मुलाच्या मृत्यूची घटना त्यांना सहन झाली नाही आणि त्यामुळे आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्यात त्यांचाही मृत्यू झाला. (The father also died due to the shock of the son's death) पिता आणि पुत्र यांचा काही वेळेत मृत्यू झाल्याने जैन कुटुंबावर मोठा आघात झाला असून परिसरातील नागरिक आणि नातेवाईक यांना देखील या घटनेने मोठा धक्का बसला आहे.   


आधीही अशाच घटना !

गरबा खेळताना मृत्यू होण्याची चार दिवसातील ही तिसरी घटना आहे. वाशीम जिल्ह्यात कारंजा लाड येथे नुकतीच अशी घटना घडली आहे. गोपाल इन्नानी हे गरबा खेळत असताना त्यांना हृद्यविकाराचा झटका आला आणि ते तत्क्षणी खाली कोसळले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले परंतु तत्पूर्वी त्यांचाही मृत्यू झाला होता. सुशील काळे यांच्यासोबत देखील अशीच घटना घडली आहे . गरबा खेळून ते घरी आले होते. सकाळी झोपेतून उठल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचाही हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.   


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !