BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ फेब्रु, २०२२

आ. नितेश राणे यांचा जामीन फेटाळला ! कोर्टाबाहेर तणावपूर्ण ड्रामा !

 




सिंधुदुर्ग : भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या पी ए ला पोलीस कोठडी देण्यात आली त्या पाठोपाठ आज राणे यांचाही जामीन फेटाळला आहे. राणे यांची गाडी न्यायालयाबाहेर पोलिसांनी रोखली आणि यावेळी निलेश राणे आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. 



शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचे पी ए  राकेश परब  यांना चार फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. राकेश परब यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता त्यानंतर ते पोलिसांना शरण आले होते. त्यांना आज न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडीचा आदेश दिला आहे.  त्यानंतर नितेश राणे यांचा जामीन देखील फेटाळला आहे.  


आ. नितेश राणे हे गेल्या काही दिवसांपासून अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात देखील धाव घेतली पण त्यांना कुठेही दिलासा मिळालेला नाही. त्यांना पुन्हा जिल्हा न्यायालयात यावे लागले आहे. काल सोमवारी दोन्ही बाजूंचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले आहे आणि आज त्यावर फैसला आला. जामीन नाकारण्यात आल्यानंतर पोलिसांनी राणे यांची गाडी रोखून धरली आणि राणे समर्थकानी पोलिसांशी हुज्जत घातली. 

कुठल्या अधिकाराने आम्हाला रोखले आहे ? असा सवाल पोलिसांना करण्यात येत होता. आम्हाला कायदा शिकऊ नका असे राणे पोलिसांना म्हणत होते.  काही काळ येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. त्यानंतर नितेश राणे गाडीच्या खाली उतरून परत कोर्टाच्या आत गेले. न्यायालयातील उर्वरित प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ते बाहेर आले.  नितेश राणे आता जामिनासाठी उच्च न्यायालयात जाणार आहेत. काही वेळेनंतर नितेश राणे न्यायालयाबाहेर पडले. पोलीस केवळ दादागिरी करीत असल्याचे राणे यांच्या वकिलांनी यावेळी सांगितले. काही काळ बराच तणाव निर्माण झाला होता. न्यायालयाच्या आदेशाबाबत स्पष्टता नव्हती त्यामुळे पोलिसांनी रोखले होते. 

सर्वोच्च न्यायालयाने राणे यांना दहा दिवसांचा दिलासा दिला असल्याने जामीन फेटाळला असला तरी त्यांना अटक करता आलेली नाही.     




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !