BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२८ फेब्रु, २०२२

राज्यावर पुन्हा 'लोड शेडींग' चे संकट, ऊर्जामंत्र्यांचे संकेत !

 


अकोला : शेतकरी शेतीसाठी दिवसा वीज द्यावी म्हणून आंदोलन करीत असतानाच राज्यावर पुन्हा लोडशेडींगचे संकट येताना दिसत असून राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनीच हे संकेत दिले आहेत.


महाराष्ट्राने अनेक वर्ष मोठ्या भारनियमनाला तोंड दिले आहे त्यामुळे भारनियमन म्हटले की भरदिवसा देखील डोळ्यापुढे अंधार दिसू लागतो. अलीकडे भारनियमनाच्या संकटातून सुटका झाली आहे असे वाटत असतानाचा पुन्हा हे संकट घोंगावू लागले आहे. शेतीसाठी दिवसा वीज द्यावी अशी मागणी शेतकरी करीत असून त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अत्यंत प्रखर आंदोलन सुरु केले आहे. त्यातच महावितरणचे कोल्हापूर आणि सांगलीतील कार्यालय आगीत होरपळले आहे.  शेतकरी दिवसा वीज मागत आहेत पण त्याकडे दुर्लक्ष होत असताना आता लोडशेडींगचा विषय पुढे आला आहे.


अकोला येथील एका कार्यक्रमात बोलताना उर्जा राज्यमंत्री नितीन राऊत यांनी हे आगामी भारनियमनाचे संकेत दिले आहेत. यावेळी त्यांनी वीज बील वेळेत भरावे असे ग्राहकांना आवाहन केले. वीजेचे बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा तोडला जातो यात नवे काहीच नाही, वीज वितरण करणारी एक कंपनी आहे आणि या कंपनीला टंचाईमुळे जादा दर देवून कोळसा खरेदी करावा लागतो. हा कोळसा खरेदी करण्यासाठी जर वेळेत पैसे उपलब्ध झाले नाहीत तर राज्यात पुन्हा लोडशेडींग होऊ शकते असे स्पष्टपणे उर्जामंत्र्यांनी सांगितले. 


कोरोनाच्या कालावधीत विजेचा तुटवडा होणार नाही याची काळजी घेण्यात आली आणि अखंड वीज उपलब्ध करून दिली आहे पण राज्यात सद्या विजेचा प्रश्न गंभीर झालेला आहे. महापूर, चक्रीवादळ अशी संकटे आली आणि तिथलाही पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. कोळशाची टंचाई देशात आणि परदेशातही निर्माण झाली आहे. त्यामुळे बाहेरून जादा दराने वीज खरेदी करून पुरवठा केला जात आहे. ग्राहकांनी वेळेत आपली बिले भरली तरच या अडचणीवर मात करता येऊ शकते असेही त्यांनी सांगितले.


वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा बंद केला जाणारच याचा पुनरुच्चार उर्जामंत्री यांनी केला आहे. कुणासाठीही वीज मोफत दिली जाणार नाही. विजेची निर्मिती करण्यासाठी कोळसा, पाणी याची गरज असते शिवाय कर्मचाऱ्यांचे पगार असतात. बँकेतून घेतलेल्या कर्जाचे व्याज भरावे लागते या सर्व बाबींसाठी पैसा कुठून आणणार ? असे प्रश्न उपस्थित करीत त्यांनी बिले न भरलेल्या ग्राहकांचे वीज कनेक्शन कापले जाणारच असे सांगितले.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !