BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ फेब्रु, २०२२

म्हणून लता मंगेशकर यांनी तेरा वर्षे केलं होतं बोलणंच बंद !




श्रद्धांजली !



गानकोकिळा म्हणून ज्यांचा उल्लेख आदराने केला जातो त्या लता मंगेशकर आणि ट्रॅजेडी किंग म्हणून ज्यांचा परिचय आहे असे दिवंगत अभिनेते दिलीपकुमार हे दोघेही आपापल्या स्थानावर सर्वोच्च उंचीवर पोहोचले कलावंत आहेत. लाटा दीदींनी गायन आणि दिलीपकुमार यांनी अभिनय क्षेत्रात अद्वितीय स्थान निर्माण केले आहे आणि ते अढळ आहे. केवळ कलावंत म्हणूनच नव्हे तर या दोघांत अत्यंत जवळचे, आपुलकीचे नाते होते. दिलीपकुमार हे तर लतादीदींना आपली बहीण मानायचे. लता दीदी देखील दिलीप कुमार याना न विसरता राखी बांधत होत्या. परस्परात घट्ट नातं त्यांनी जपलं होतं आणि या नात्यात असा काही दुरावा आला की, या दोघांनीही एकमेकांशी बोलणंच बंद केलं !



लता मंगेशकर आणि दिलीप कुमार यांच्या नात्यातील घट्ट वीण एकाएकी एवढी सैल झाली की तब्बल तेरा वर्ष त्यांच्यात अबोला राहिला.  एकाच क्षेत्रात दोन्ही नामवंत कलावंत काम करीत राहिले पण  तेरा वर्षात एक चकार शब्द दोघात झाला नाही. अवघ्या चित्रपट सृष्टीला देखील या आश्चर्यजनक वाटून गेले. हा अबोला १९७० च्या दशकापर्यंत सुरूच राहिला होता. 'मुसाफिर' चित्रपटातील 'लागी नही छुटे' हे गाणे गाण्यासाठी संगीतकार सलील चौधरी यांनी दिलीपकुमार यांची निवड केली होती., पण दिलीपकुमार आपल्यासोबत गाणे गाणार आहेत हे लता मंगेशकर याना माहित नव्हते आणि यातूनच दोघांच्या जिव्हाळ्याच्या संबंधात एक ठिणगी पडली.  



दिलीपकुमार हे तसे हाडाचे अभिनेते, पण ते हे गाणे गाणार होते आणि ते देखील लता मंगेशकर यांच्यासोबत ! दिलीपकुमार यांनी या गाण्यासाठी गायनाचा रियाज केला होता आणि ते हे गाणे गाण्यासाठी सज्ज झालेले होते. लता मंगेशकर याना जेंव्हा याची माहिती मिळाली तेंव्हा त्या थोड्या थबकल्या. दिलीपकुमार हे गाणं गाऊ शकतील की नाही याबाबत त्या साशंक होत्या.   आधीच दिलीपकुमार लता मंगेशकर यांच्याबरोबर एक गाणे गाताना घाबरलेले होते. आता हे गाणे ध्वनिमुद्रित करण्याचा विषय आला तेंव्हाही ते काहीसे नर्व्हस दिसू लागले. तसं पाहिलं तर लता मंगेशकर या खूपच चांगल्या गायिका असल्याने दिलीपकुमार यांची अस्वस्थता होती. संगीतकार सलील चौधरी यांनी त्यांची हे अवस्था पाहून त्यांना ब्रँडी प्यायला दिली आणि 'लागी नही छुटे' हे गाणे त्यांनीच संगीतबद्ध केले होते.

 

चौधरींनी दिलेली ब्रँडी पिल्यानंतर दिलीप कुमार यांनी हे गाणे लता मंगेशकर यांच्यासोबत गायले पण लता मंगेशकर यांच्या आवाजापुढे दिलीपकुमार यांचा आवाज कमकुवत वाटू लागला होता. लता दीदींनी त्यांचे गाणे पूर्ण क्षमतेने गायले होते. दिलीपकुमार यांचा आवाज कमी पडला त्याला त्या तरी काय करणार होत्या ? पण दिलीपकुमार मात्र अधिकच अस्वस्थ झाले होते. या गाण्याच्या रेकॉर्डिंगनंतर त्यांच्यात मतभेदाची ठिणगी पडली आणि अबोला सुरु झाला. या ठिणगीची आग प्रदीर्घ काळ म्हणजे तब्बल तेरा वर्षे भडकत राहिली. अखेर तेरा वर्षांनी त्यांच्यातील अबोला संपुष्टात आला आणि लता दीदींनी त्यांना पुन्हा राखी बांधली.  



लता मंगेशकर आणि दिलीप कुमार यांच्यात मतभेद झाल्यानंतर त्यांच्यातील बोलणं बंद झालं होतं,  लता मंगेशकर याना पाहून दिलीप कुमार म्हणाले होते , ' मराठी भाषिक लोकांना उर्दू म्हणजे डाळ भात वाटतो' लता मंगेशकर याना मात्र ही गोष्ट खूप खटकली, त्यांच्या जिव्हारी हे शब्द लागले होते. यामुळे त्यांनी दिलीपकुमार यांच्याशी बोलणे बंद केले. एवढेच नव्हे तर लता दीदींनी उर्दू शिकण्याचा निर्णय घेतला होता.  जेंव्हा त्यांच्यात बोलणे सुरु झाले तेंव्हा दोघेही भूतकाळ विसरून गेले होते. पण तब्बल तेरा वर्षे त्यांच्यातील हा अबोला टिकून राहिला होता .   



हे देखील वाचा :>>

अशा बेशुद्ध झाल्या होत्या लता मंगेशकर !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !