नवी दिल्ली : गानकोकिळा, भारताचे भूषण भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने अवघा देश शोकमग्न असून त्यांची निधनामुळे देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
जगण्या मारण्याची तब्बल २८ दिवस झुंज देवून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला. कालपासूनच देशाच्या काळजाचा ठोका चुकलेला होता आणि काहीतरी अघटीत घडण्याचे संकेत मिळत होते. अखेर आज लतादीदी निघून गेल्या आणि भारत शोकाकुल झाला. त्यांचे निधन झाले असले तरी लतादीदीसारखे कलावंत सदैव अमर असतात, त्यांचा देह गेला तरी त्यांचा आवाज पिढ्यानपिढ्या कानात आणि त्यांची आठवण मनामनात कायम असणार आहे. त्यांच्या निधनामुळे देशात दोन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून तिरंगी ध्वज देखील अर्ध्यावर उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सायंकाळी साडे सहा वाजता मुंबईत शिवाजी पार्क येहते त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदी, उपराष्ट्रपती व्यंकया नायडू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीने प्रमुख शरद पवार आदींनी लतादीदींच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. भारतरत्न असलेल्या लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव त्यांच्या प्रभू कुंज या निवासस्थानी ठेवले जाणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !