पुणे : आपल्यावर झालेला आक्रमक हल्ला हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच आदेशाने झाला असून आपण याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करणार आहोत असे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्री यांच्यावर सतत भ्रष्टाचाराचे आरोप करीत असतात. नुकतेच त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर असाच आरोप केला आहे. पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड रुग्णालयाच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचे त्यांचे म्हणणे असून त्यासंदर्भात निवेदन देण्यासाठी ते पुणे महापालिकेत आले होते. यावेळी त्यांना शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली. आपल्यावर शिवसैनिकांनी जोरदार आक्रमक हल्ला केला आहे असे सोमय्या यांचे म्हणणे आहे. या झटापटीत सोमय्या खाली देखील पडले होते आई त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. सोमय्या यांनी पुण्याच्या संचेती रुग्णालयात उपचार घेतले आहेत तर ६० ते ७० शिवसैनिकावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ठराविक निवडक प्रकरणावर काय चर्चा करता ? पुणे महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत का बोलत नाही असे शिवसैनिकांनी त्यांना विचारले तेंव्हा 'आपणास माहिती द्या, प्रशासनाशी बोलतो' असे आपण सांगितले. त्याचवेळी शिवसैनिक घोषणाबाजी करीत आले आणि हल्ला केल्याचे सोमय्या यांचे म्हणणे आहे. प्रसंगाचे गांभीर्य पाहून सुरक्षा रक्षकांनी सोमय्या यांना गाडीत बसविले होते. शिवसैनिकांनी केलेला हल्ला हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच आदेशाने झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत आपण पंतप्रधान यांच्याकडे तक्रार करणार आहोत. यासाठी गुरुवारी दिल्लीला जाणार आहे असेही सोमय्या यांनी सांगितले आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करीत महाविकास आघाडीवर टीका देखील केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !