BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ फेब्रु, २०२२

जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन !

 


मुंबई : चित्रपट सृष्टीतील जेष्ठ आणि दिग्गज अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. मृत्युसमयी त्यांचे वय ९३ वर्षांचे होते. 


जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाले असल्याची माहिती त्यांचे चिरंजीव अजिंक्य देव यांनी दिली आहे. रमेश देव यांनी ३० जानेवारी रोजीच आपला ९३ वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने चित्रपट जगतात शोक व्यक्त होत असून जुन्या पिढीतील ते एक नामवंत अभिनेते होते आणि त्यांनी हिंदी चित्रपट क्षेत्रातही नाव कमावले होते.  


अभिनेते रमेश देव यांचा मराठी चित्रपट सृष्टीसह हिंदी सिनेमात देखील मोठा दबदबा होता. मुळचे राजस्थानमधील जोधपुर येथील ठाकूर घराण्यातील असलेल्या देव यांचा जन्म कोल्हापूर येथे ३० जानेवारी १९२९ साली झाला होता.  राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे त्यांचे नाव देव असे पडले होते. एका न्यायालयीन प्रकरणात रमेश देव यांच्या वडिलांनी  शाहू महाराजांना मदत केली होती आणि त्यावेळी 'तुम्ही ठाकूर नाहीत तर देव आहात' असे महाराज त्यांना म्हणाले होते आणि तेंव्हापासून त्यांचे नाव 'देव' असे रूढ झाले होते. अभिनेत्री सीमा आणि रमेश देव यांचा विवाह झाला होता आणि ही जोडी कायम पडद्यावर गाजत राहिली. त्यांनी २८५ पेक्षा अधिक हिंदी चित्रपट आणि १९० मराठी चित्रपटातून भूमिका केल्या होत्या. हिंदी सिनेमात ते खलनायक म्हणून गाजले होते. मराठी नाटक आणि दूरदर्शन मालिकातून देखील त्यांनी अभिनय केला होता. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !