पंढरपूर : शहराकडे येणाऱ्या विविध रस्त्यावर सतत अपघात होतच आहेत पण आता पंढरपूर शहरात देखील ट्रकने दुचाकीस दिलेल्या धडकेमुळे दुचाकीस्वार ठार होण्याची घटना घडली आहे.
पंढरपूर शहरातील सरगम चौक ते अहिल्या पूल दरम्यानचा रस्ता धोकादायक बनलेला असून छोटे मोठे अपघात सुरुचा असतात. रस्ता दुभाजक सोयीचा होण्याऐवजी गैरसोयीचा आणि अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. याच मार्गावर एका ट्रकने दुचाकीला उडवले आणि दुचाकी स्वाराचा या अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अहिल्यादेवी चौकाच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीस्वारास ट्रकने उडवले आणि अपघात करून ट्रकचालक ट्रकसह पळून गेला
पंढरपूर शहराकडून अहिल्या चौकाच्या दिशेने दुचाकी चालली होती आणि त्याच्या पाठीमागून एक ट्रक येत होता. या ट्रकने दुचाकीस थेट धडक दिली. ही धडक खूपच जोराची होती. धडक दिल्यानंतर दुचाकी खाली पडली पण आणि दुचाकीस्वार देखील कोसळला. अपघात केल्यानंतर ट्रकचालकाने थांबण्याऐवजी त्याने करकंब रस्त्याने पळ काढला. तथापि त्याला भोसे पाटी येथे पकडण्यात आले आहे. दुचाकीस्वार गाडीवरून रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला जोराचा मार लागून त्याचा मृत्यू झाला आहे. अपघातात तो जखमी होताच त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
अपघातात मृत्युमुखी पडलेला दुचाकीस्वार हा पाथर्डी तालुक्यातील असून त्याचे नाव उमेश रामू चव्हाण असल्याचे आढळून आले आहे. त्याच्या खिशात सापडलेल्या आधार कार्डवर हे नाव आहे. अपघात करून पळून गेलेला ट्रक चालक शुभम पटेल याला भोसे पती येथे पकडून आणण्यात आले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक चालक शुभम पटेल हा मध्य प्रदेशातील बुदेरू. ता. इहार सतना येथील आहे. अपघातानंतर पळून जाण्याचे त्याने केलेला प्रयत्न फसला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !