मुंबई : कोरोनाची तिसरी लाट आगामी पंधरा ते वीस दिवसात आटोक्यात येईल अशी माहिती आता राज्याच्या टास्क फोर्सनेच दिली असल्याने कोरोनापासून लवकर सुटका होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
कोरोनाच्या पहिला आणि दुसऱ्या लाटेने जगणे आणि मरणेही कठीण केले होते. तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे दिसून येत होती आणि अखेर कोरोनाची तिसरी लाट चोर पावलाने आली परंतु पहिल्या दोन लाटेसारखा विध्वंस या लाटेने केला नाही. कोरोनाची तिसरी लाट देखील आता परतीच्या मार्गावर असून या आधीच राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलासा दिला होता. कोरोनाची तिसरी लाट १५ फेब्रुवारी पासून कमी होण्यास सुरुवात होईल असे सांगण्यात आले होते पण तत्पूर्वीच ही लाट ओसरताना दिसत आहे. हा एक मोठा दिलासा मानला जात आहे. जेवढ्या वेगाने ही लाट आली तितक्याच वेगाने ती परतीच्या मार्गालाही लागली आहे.
कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारी अखेरीस संपण्याचा दिलासा आता टास्क फोर्सनेच दिला आहे. त्यामुळे हा मोठा दिलासा मानला जात आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरली तरीही गाफील राहून चालणार नाही असे मात्र टास्क फोर्सने आवर्जून सांगितले आहे. पुढच्या पंधरा ते वीस दिवसात कोरोनाची तिसरी लाट पूर्णपणे आटोक्यात येईल असे मात्र सांगण्यात आले आहे. तिसरी लाट आता संपत आली असून येत्या पंधरा दिवसात रुग्णांची संख्या एकदम कमी होणार आहे. याचाच अर्थ फेब्रुवारीच्या शेवटापर्यंत कोरोनाची तिसरी लाट संपलेली असेल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे.
राज्यातील २३ जिल्ह्यातील दर सरासरीपेक्षा अधिक आहे परंतु सर्वच जिल्ह्यातील सरासरी दर एकाचा असू शकत नाही. कुठे कमी तर कुठे अधिक अशी परिस्थिती असणार आहे परंतु कोरोनाची लाट पूर्णपणे आटोक्यात आलेली असेल. दिलासादायक परिस्थिती निर्माण होणार असली तरी गाफील राहता येणार नाही. कोरोनाच्या नियमांकडे लगेच दुर्लक्ष करता येणार नाही. कोरोनाची लाट ओसरतेय म्हणून बेफिकीर राहणे महागात पडू शकते. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या घटताना दिसत असून तिपटीने रुग्ण कमी झालेले आहेत. नव्या रुग्णांची संख्या वेगाने घटत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. हा एक मोठा दिलासा असून टास्क फोर्सनेच तो दिला असल्याने त्याला एक वेगळे महत्व आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !