सोलापूर : उद्यापासून पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार असून शाळकरी मुले जेथे असतील तेथे ही लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला असून लसीकारणाचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेल्या व्यक्तीनाही कोरोनाची बाधा होत असली तरी धोका अत्यंत कमी होत आहे आणि तिसऱ्या लाटेला अटकाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस अत्यंत महत्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. अठरा वर्षे वयापुढील तरुणांपासून वृद्धापर्यंत ही लस उपलब्ध करून देण्यात आली होती परंतु आता पंधरा ते अठरा वयोगटात ही लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वयातील मुलांना उद्या ३ जानेवारी पासून लस देण्यात येत असून पोर्टलवर नोंदणी आधीच सुरु झाली आहे. पंधर ते अठरा वर्षे वयाच्या मुलांना कोवॅक्सीन लस देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात ६५० विशेष केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. शक्य असेल त्या ठिकाणी या मुलांना ही लस देण्यात येणार असून शाळामधूनही कॅम्पचे आयोजन करून लस देता येईल काय ? याचीही चाचपणी सुरु आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत ६० वर्षे वयाच्या दरम्यान वय असलेल्या नागरिकांचे अधिक मृत्यू झाले आणि दुसऱ्या लाटेत ४० वर्षे दरम्यान वयाच्या तरुण व्यक्तींना मृत्यूला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आता तिसऱ्या लाटेच्या दरम्यान १५ वर्षे वयावरील मुलांना धोका होऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे पालकांची लसीकरणाबाबत अधिक दक्ष आणि जागरूक राहण्याची गरज आहे. मुलांच्या सुरक्षेसाठी शासनाने पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे आणि उद्यापासून हे लसीकरण सुरु देखील होत आहे. मुलांसाठी कोवॅक्सीन लस देण्याचा निर्णय घेतला असून सद्या राज्यात कोवॅक्सीनचे ४५ लाख डोस उपलब्ध आहेत. या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घेता येतो. या मुलांचे लसीकरण करण्यासाठी प्रशासन सज्ज असून शक्य तेवढे अधिक लसीकरण करण्याचा प्रयत्न आहे.
cowin पोर्टलवर लसीकरणासाठी मुलांची नोंदणी सुरु असली तरी ज्या विध्यार्थ्यानी ऑनलाईन नोंदणी केलेली नाही अशा विद्यार्थ्यांनाही त्यांचे आधार कार्ड पाहून जागेवरच लस दिली जाणार आहे. कोरोनाच्या पहिल्या दुसऱ्या लाटेचा थरारक अनुभव आणि तिसरी लाट याचा विचार करून पालकांनी आपल्या पंधरा वर्षे वयाच्या पुढील मुलांचे लसीकरण करून घेणे अत्यावश्यक बनले आहे. उद्यापासून मुलांचे लसीकरण सुरु होत आहे.
वाचा > क्लिक करा >> पंढरीत मुलीला धक्का लागला म्हणून पेट्रोल टाकून जाळली दुचाकी !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !