मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने मनामनात धडकी भरवली असताना च राज्याचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी तर जबर धक्काच दिला असून ओमीक्रॉनच्या संसर्गाने महाराष्ट्रात ८० हजार रुग्णांचे प्राण जातील अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मानवाने खूप काही भोगले आहे, त्याची आठवण काढतानाही अंगावर काटा उभा राहतो. जवळची माणसं कोरोनाने हिरावून नेली असून घरादाराचे आधार गेले आहेत. सगळीच चाकं बंद राहिल्याने र्थचक्र कोरोनाच्या गाळात रुतून बसले आहे. यातून बाहेर निघण्यासाठी मोठा कालावधी लागणार असून त्यापूर्वीच पुन्हा ओमीक्रॉन आणि कोरोनाची तिसरी लाट माणसाला उध्वस्त करण्याच्या तयारीत आहे. केवळ कल्पनेनेंही आता काळजाचा थरकाप होऊ लागला असताना तिसऱ्या लाटेबाबत अभ्यासकांचे समोर येणारे मत धडकी भरविल्याशिवाय राहत नाही. राज्याच्या आरोग्य सचिवांनीच धक्कादायक अंदाज व्यक्त केला असल्याने त्याला वेगळे महत्व निश्चित आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याचे तर या आधीच तज्ज्ञांनी मान्य केले आहे. मागील दोन वर्षे संकटात गेल्यानंतर हे नवे वर्ष तरी काही सुख समाधान घेऊन येईल अशी अपेक्षा होती पण नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून धक्क्यावर धक्के बसू लागले आहेत. रुग्णांची सख्या अशीच वेगाने वाढत राहिली तर काही दिवसात राज्यातील लाखो लोक बाधित झालेले असतील आणि एका टक्क्याच्या होशोबाने पहिले तरी ८० हजार लोकांचे मृत्यू होतील असा अंदाज आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या अंदाजाने महाराष्ट्र हादरला आहे. जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात बाधित रुग्णांची संख्या दोन लाखावर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत राज्यात ८० लाख लोक बाधित झाली आणि त्यातील एक टक्का रुग्णाचा मृत्यू झाला तरी ८० हजार रुग्णांचे मृत्यू होतील असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे. आरोग्य सचिव यांनी हे सर्व राज्यातील जिल्हाधिकारी याना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
राज्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकारी याना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी भविष्यातील धोक्यांची जाणीव करून दिली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जर ८० लाख लोक बाधित झाले तर त्यातील एक टक्का मृत्यू झाले तरीही ८० हजार रुग्ण दगावणार आहेत. 'ओमीक्रॉन' ला हलक्यात घेऊ नका , लसीकरण न झालेल्या व्यक्तींसाठी हा विषाणू खूपच घातक सिद्ध होणार आहे. त्यामुळे लसीकरणाची संख्या वाढविण्याची गरज असून त्यातूनच अनेकनाचे प्राण वाचवता येतील असे डॉ. व्यास यांनी म्हटले आहे. त्यामुळे घाबरून जाण्यापेक्षा दक्षता घेणे आणि काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे आपल्या हातात असून ओमीक्रॉन आणि तिसऱ्या लाटेला निष्प्रभ करण्यासाठी प्रत्येकानेच योगदान देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
वाचा > क्लिक करा >> पंढरीत मुलीला धक्का लागला म्हणून पेट्रोल टाकून जाळली दुचाकी !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !