पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने पुन्हा एकदा चिंता निर्माण केलेली असताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलासा दिला असून कोरोनाची तिसरी लाट ओसरली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
राज्यातील कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे पण काही शहरात रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे तर काही भागात ती वाढत आहे. कोरोनाचे रुग्ण राज्यात कमी होत असून तिसरी लाट हळूहळू ओसरु लागलेली आहे. असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला असल्याने कोरोनाच्या दडपणाखाली असलेल्या जनतेला दिलासा मिळाला आहे. राज्यात बुस्टर डोस दिला जात असून लहान मुलांचे लसीकरणही वेगाने होत आहे. लसीकरण चांगले झाल्यामुळे कोरोनाचे रुग्ण दवाखाण्यापासून दूर राहिलेले आहेत. रुग्णसंख्या वाढूनही रुग्णालयात रुग्णांची फारशी गर्दी यावेळी झालेली नाही त्यामुळे राज्याच्या आरोग्य यंत्रणेवरील भार देखील यावेळी कमी झाला आहे. आता तर कोरोना प्रतिबंधात्मक लस मेडिकल दुकानातून देखील उपलब्ध होणार असून त्यामुळे वेगाने लसीकरण होईल असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला आहे.
कोरोनाची तिसरी लाट ओसरत निघाली असल्याने मास्कपासून सुटका होण्याची चर्चा कालपासून राज्यात सुरु आहे. शिथिलता देण्यासारखी परिस्थिती राज्यात आहे काय याबाबत टास्क फोर्सने मार्गदर्शन करावे अशी चर्चा बैठकीत झाली आहे. कोरोनाचे रुग्ण राज्यात वाढत असताना ओमीक्रोनचाही धोका वाढत होता त्यामुळे काही निर्बंध लावले लागले आहेत. त्यामुळेच शाळा आणि महाविद्यालये देखील बंद करावी लागली आहेत. आता मात्र रुग्णांची संख्या कमी कमी होत निघाली आहे आणि मृत्यूचा दर देखील कामिई होत चालला आहे. त्यामुळेच तर शाळा महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे देखील टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !