BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ जाने, २०२२

खोट्या आरोपाने मन दुखावले, गृहस्थांची आत्महत्या !

 



माळीनगर : अनैतिक संबंधांचे करण्यात आलेले खोटे आरोप आणि त्यासाठी करण्यात आलेली मारहाण यामुळे मन दुखावल्याने माळशिरस तालुक्यातील एका व्यक्तीने झाडाला गळफास लाऊन आत्महत्या केली आणि आपले जीवन संपवल्याची घटना घडली.


सभ्य आणि स्वाभिमानी माणसाना खोटे आरोप सहन करता येत नाहीत. अकारण समाजात आपली बदनामी होऊ नये असा अशा व्यक्तींचा नेहमी पर्यंत असतो आणि अशी माणसं नेहमी आपली प्रतिष्ठेला जपत असतात. अशा वेळी अकारण स्वाभिमानाला काही धक्का लागला तर जगण्यातच काही अर्थ नसल्याची भावना अशा चांगल्या व्यक्तींची होत असते आणि मग त्यातूनच कुणी आपल्या आयुष्याचा शेवट आपल्याच हाताने करून घेत असतो. अशा घटना अधूनमधून समाजात घडत असतात आणि अशीच एक घटना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील बिजवडी येथे घडली असल्याचे समोर आले आहे. महिलेशी अनैतिक संबंध नसताना तसे आरोप करण्यात आल्यामुळे प्रचंड दुखावल्या गेलेल्या सुनील शिंदे यांनी टोकाचे पाउल उचलले.  


अक्षय सुनील शिंदे यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या घटनेने परिसरात धक्का बसला आहे. सुनील ज्ञानोबा शिंदे या ४५ वर्षे वयाच्या व्यक्तीने बिजवडी येथेच एका झाडाला गळफास लाऊन आत्महत्या केली आणि आपले जीवन संपवले. ही घटना समोर आल्यानंतर आत्महत्या केल्याचे धक्कादायक आणि हृदयद्रावक कारण समोर आले आहे. सुनील शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मयत सुनील ज्ञानोबा शिंदे यांना बिजवडी, रावबहादूर गट येथे राहणाऱ्या तुकाराम दत्तू शिंदे याने अकलूज येथील सरकारी दवाखान्याजवळ बोलावून घेतले. तेथे हरिभाऊ महादेव ढोबळे, काशिनाथ विठ्ठल ढोबळे यांनी सुनील शिंदे यांना आपली दुचाकीवर बसवून पंचवटी येथे नेले. तेथे गेल्यावर 'तू गावातील महिलेशी अनैतिक संबंध ठेवतोस काय ?' अशी विचारणा करीत शिवीगाळ करण्यात आली. दमदाटी करीत लाथा बुक्क्यांनी सुनील शिंदे यांना मारहाण करण्यात आली. 


या मारहाणीनंतर सांयकाळी एका महिलेला घेऊन काही जण सुनील शिंदे यांच्या घरी पोहोचले. हरिभाऊ ढोबळे याच्यासह महादेव सोपान ढोबळे, काशिनाथ विठ्ठल ढोबळे, युवराज दत्तू ढोबळे हे होतेच. 'तू या महिलेशी अनैतिक संबंध ठेवले आहेत, आता तू हिला तुझ्या घरी ठेवून घे आणि तिहा सांभाळ कर. तसे नाही केलेस तर तुला जिवंत ठेवणार नाही' असे धमकावत पुन्हा शिवीगाळ केली आणि दमदाटी करीत मारहाण केली होती. आपल्यावर आलेल्या खोट्या आरोपामुळे आणि झालेल्या मारहाणीमुळे सुनील शिंदे यांचे मन दुखावले गेले आणि त्यातून त्यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. या फिर्यादीनंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  


हे देखील वाचा : निर्बंधात पुन्हा बदल, आता दुकानेही राहणार ठराविक वेळेत बंद !






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !