BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ जाने, २०२२

सोलापूर जिल्ह्यातील लाखो लोक अजूनही लसीविनाच !

 


सोलापूर : तिसऱ्या लाटेचे प्रताप डोळ्यांना दिसू लागले तरी अद्याप सोलापूर जिल्ह्यातील लाखो लोक लसीविनाच असून पंढरपूरसहा पाच तालुके भलतेच पिछाडीवर आहेत.


कोरोनाच्या मागील दोन लाटांत बरेच काही वाहून गेले असले तरी देखील लोक गंभीर व्हायला तयार नसल्याचे चित्र दिसत आहे. मास्क वापरण्यात काहीही अवघड आणि अशक्य नसले तरी उघडी तोंडं करून रस्त्यावरून मोकाट फिरत असतात. साधेसुधे नियम देखील न पाळणारे अनेक लोक आहेत. लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रशासन दिवसरात्र परिश्रम घेत असले तरी अद्याप लाखो लोक लसीविनाच गावभर भटकत आहेत, स्वत:च्या आरोग्याची आणि जीवाची तर काळजी नाही, आपल्या कुटुंबाची काळजी नाही, तो समाजाची आरोग्याची किती काळजी असू शकेल याचा सहज अंदाज येऊ शकतो. सोलापूर जिल्ह्यात लस न घेतलेले लाखो लोक आहेत त्यात पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, करमाळा, मोहोळ हे तालुके पिछाडीवर आहेत. पंढरपूर तालुक्याने मागच्या दोन्ही लाटेत खूप काही भोगले आहे आणि चालती बोलती माणसं कोरोनाने हिरावली आहेत तरीही आज पंढरपूरच्या कोणत्याही रस्त्यावर कोरोनाला अजिबात न घाबरणारी अनेक मंडळी पाहायला मिळतात.

    

सोलापूर शहरातील एक लाख १२ हजार नागरिकांनी अजूनही लस घेतली नाही. पंढरपूर तालुक्यातील १ लाख १२ हजार ३५१ नागरिकांनी अजूनही लस घेतली नाही दक्षिण सोलापूर तालुक्यातील १३ हजार २०, उत्तर सोलापूर तालुक्यातील ११ हजार ३९२, मोहोळ तालुक्यातील ४० हजार ७१७, मंगळवेढा तालुक्यातील ३४ हजार ६७९, सांगोला तालुक्यातील ४९ हजार ५२७, माढा तालुका ३७ हजार ८६३, करमाळा तालुका ३८ हजार ९३ माळशिरस तालुक्यातील ८१ हजार ३४८, बार्शी तालुक्यातील ४७ हजार ४७२ नागरिकांनी अजूनही कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही. लस न घेतलेल्यात १८ ते ४४ वयोगटातील पाच लाख तर १५ ते १७ वयोगटातील २ लाख २५ हजार लोकांनी लास घेतली नाही तर साथ वर्षे वयाच्या पुढील २९ हजार नागरिकांनी लसीकडे पाठ फिरवली आहे. लस न घेणाऱ्यात तरुणांचीच संख्या अधिक आहे.


लसीबाबत असलेल्या गैरसमजातून अधिकाधिक लोकांनी लस घेतली नसल्याचे दिसते. कुठे तरी कुणाकडून काही ऐकलेले, कुणीतरी अज्ञानातून काही सांगितलेले आणि त्यावर ठेवलेला विश्वास या लोकांना लसीकरण केंद्रापर्यंत जाऊ देत नाही. लसीबाबत काही अपप्रचार झाला असला तरी लसीचे काही वेगळे फायदे झाल्याचेही समोर आले आहे. अनेक प्रकरच्या जुन्या व्याधी या लसीमुळे ठीक झाल्याच्या काही घटना समोर येत आहेत. कुणाचा चार वर्षापासूनच लकवा ठीक झाला. ज्याला चार वर्षांपासून जागेवरून उठायला येत नव्हते असे लोक चालू बोलू लागल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून मिळत आहेत. पण वाईट बातम्याच अधिक लक्षात ठेवून आणि गैरसमज करून घेवून लस घेण्यास टाळाटाळ केली जाते त्यामुळेच सोलापूर जिल्ह्यातही लाखो लोक आजही लसीविना रस्त्यावरून फिरताना दिसत आहेत. 


हे देखील वाचा : लस घेण्याची बळजबरी करता येत नाही !   






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !