BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ जाने, २०२२

आ. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला !

 





मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या भाजप आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे त्यामुळे नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री  नारायण राणे यांना हा मोठा धक्का आहे. 


संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना पोलिसांनी बोलावले असता दोन वेळा ते हजर राहिले पण नंतर मात्र त्यांनी पोलिसात हजर राहण्याऐवजी अज्ञातवासात जाणे पसंत केले होते. त्यांच्या अटकेसाठी पोलीस शोध घेत राहिले पण राणे यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल  केला होता. या अर्जावर प्रदीर्घ सुनावणी झाली आणि आज अखेर न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे परंतु २७ जानेवारीपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे २७ जानेवारी पर्यंत त्यांना प्रत्यक्ष अटक होणार नाही. भाजप आमदार नितेश राणे यांच्यासोबत नाव असलेले मनीष दळवी यांच्या जामिनावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केला असून नितेश राणे यांना मात्र तूर्तास जामीन नाकारण्यात आला आहे. यामुळे नितेश राणे यांच्या अडचणीत आता  मोठी वाढ झाली आहे. 


संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी सिंधुदुर्ग न्यायालयाने यापूर्वीच नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला  होता. त्यामुळे नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती पण आता तेथेही त्यांचा अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला असून आता त्यांना सर्वोच्च न्यायालय हा एकाच पर्याय उरलेला दिसत आहे.  शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांची नक्कल केल्यामुळे जाणीवपूर्वक षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता पण आता दुसऱ्या न्यायालयानेही नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे. आता नारायण राणे काय बोलणार याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !