BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ जाने, २०२२

पंढरपूर येथे संशयावरून कोयत्याने हल्ला !




पंढरपूर : केवळ संशयावरून एकावर कोयत्याने हल्ला करून जबर जखमी करण्याची धक्कादायक घटना पंढपूर शहरात घडली आहे . या घटनेबाबत  शहरातील गोविंदपुरा भागात जोरदार चर्चा सुरु आहे. 


शहरातील गोविंदपुरा भागात राहणारे महादेव भोलेनाथ अभंगराव हे आपल्या पत्नीकडे अकारण पहात असतात असा संशय नवनाथ सुब्राव कोरे यांना आला होता. या संशयातून हा हल्ला झाल्याची नोंद पोलिसात करणायत आली आहे. नवनाथ सुब्राव कोरे यांनी आणि पूनम नवनाथ कोरे यांनी मिळून महादेव अभंगराव यांच्यावर कोयत्याने वार केले आणि अभंगराव यांना जखमी केले असल्याची नोंद सोलापूर सिव्हील पोलीस चौकीत करण्यात आली आहे. 


दोघांनी मिळून कोयत्याने केलेल्या वारामुळे जखमी झालेले महादेव भोलेनाथ अभंगराव (वय ४५, रा. गोविंदपुरा, पंढरपूर ) यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पंढरपूर येथे शनिवारी घडलेल्या या घटनेची नोंद  तेथील सिव्हील पोलीस चौकीत करण्यात आली आहे.  गोविंदपुरा परिसरात या घटनेची चर्चा होत आहे.    




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !