BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ जाने, २०२२

पंढरपूर शहरातील मोठी दुर्घटना टळली !







 पंढरपूर : शहरात आज पहाटे अहिल्या पुलाजवळ एक गॅस टँकर पलटी झाला परंतु सुदैवाने यावेळी टँकरमध्ये गॅस नसल्याने शहरातील मोठी दुर्घटना टळली आहे.  


अहिल्या पुलाच्या दरम्यान आजवर अनेक अपघात झाले आहेत, रस्त्याच्या  दुकानांची गर्दी आणि दुकानापुढे लावलेली वाहने यामुळे वाहतुकीला रस्ता पुरेसा मिळत नाही . रस्त्यावरील दुभाजकाने आधीच रस्ता छोटा केला आहे त्यात दोन्ही  बाजूंच्या दुकानाची व्याप्ती रस्त्यापर्यंत आलेली असते. दुकानांच्या साहित्याने केलेले आक्रमण, ग्राहकांची वाहने आणि वाहने उभी करून अकारण थांबलेले नागरी यामुळे सरगम चौक ते अहिल्या पूल हा रस्ता कायम धोकादायक बनला असून या दरम्यान अनेक अपघात आजवर घडलेले आहेत. सायंकाळनंतर आणि रात्री तर हा मार्ग अत्यंत धोकादायक बनत असतो आणि आजचा अपघात हा पहाटेच्या सुमारास घडला आहे.
 

सरगम चौक ते अहिल्या पूल या दरम्यान असलेला दुभाजक कायम धोकादायक वाटत असताना याच दुभाजकावर आज पहाटे एक गॅस टँकर धडकला आणि तो त्याचच ठिकणी पलटी झाला. पहाटेची वेळ आणि व्यवस्थित न दिसणारा दुभाजक तसेच येथे असणारा कमी प्रकाश यामुळे टँकर सरळ दुभाजकावर चढला आणि नंतर पालथा झाला. सोलापूर येथे गॅस देऊन हा टँकर परत गॅस भरण्यासाठी सांगली जिल्ह्यात  निघालेला होता. पंढरपूर येथे अहिल्या पूल ओलांडून तो पुढे येताच सरळ दुभाजकाला धडकून पलटी झाला. यावेळी पहाटेच्या शांत वातावरणात मोठा आवाज झाला आणि परिसरातील नागरिकांना काहीतरी दुर्घटना घडल्याची जाणीव झाली. 



चालकाला दुभाजक न दिसल्याने हा अपघात झाला परंतु यावेळी रस्त्यावर वर्दळ नसल्याने काही अनुचित घडले नाही. सुदैवाने हा टँकर रिकामा होता म्हणून मोठा अनर्थ टळला, गॅसने भरलेला टँकर असता तर आज पहाटेच पंढरीत मोठी दुर्घटना घडली असती. या रस्त्यावर वारंवार होणारे अपघात  टाळण्यासाठी दुभाजक दिसेल अशी व्यवस्था होणे गरजेचे आहे. रात्रीच्या वेळी तर हे दुभाजक लक्षातच येत नाहीत त्यामुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. 

    
आज सकाळीच गुजराथमध्ये अशी एक घटना गाडली आणि सहा जणांचा मृत्यू झाला. सुरत येथे केमिकलने भरलेल्या टँकरमधून केमिकल गळती होऊन सहा जणांचा मृत्यू  झाला तर २० जण अत्यवस्थ आहेत. केमिकल टँकरमधून गळती होऊ लागली आणि १० मित्र अंतरावर झोपलेल्या मजुरांचा जीव गेला. या  टँकरचा चालक एका नाल्यात विषारी रसायन टाकत होता आणि याचवेळी त्यातून विषारी वायूची गळती सुरु झाली. हा वायू हवेत मिसळला आणि सहा मजूर ठार झाले आहेत.     


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !