दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून जगणं कठीण केलेल्या कोरोनाचं आयुष्य आता संपत आलं असून दोन महिन्यात कोरोनाचा सर्वनाश अटळ असल्याचा दावा डेन्मार्क येथल इपीडेमीओलॉजिस्ट टायरा यांनी केला असून संकटाच्या काळात हा मोठा दिलासा आहे.
दोन वर्षांपूर्वी कोरोनाचे आक्रमण झाले तेंव्हापासून प्रत्येक जण हे संकट कधी परत जातेय याची वाट पाहतोय पण लाटेमागून लाट येतच आहे. पहिल्यापेक्षा दुसऱ्या लाटेने प्रचंड विनाश केला आणि माणसांच्या जगण्याची दिशाच बदलून टाकली. नातीगोती, मित्रमंडळी परकी होत चालली तर पारंपरिक सण उत्सव साजरे करणेही कठीण झाले. वेगवेगळ्या बंधनांनी माणसांचं आयुष्यच बांधून टाकण्यात आलं. दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली पण कोरोना परतीच्या मार्गाला लागला तरी तिसऱ्या लाटेची चाहूल न लागल्याने जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच चोरपावलानं डेल्टा आणि ओमीक्रॉन हा नवा व्हेरिएंट घुसला. हळूहळू सुरवात होतेय असे वाटत असताना कोरोना पुन्हा फोफावल. आता हा कोरोना कधी परतीच्या मार्गावर निघेल हा प्रश्न ज्याला त्याला पडलेला असतानाच आणि रोज कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आणि वेगाने वाढत असताना हे संकट लवकरच परतणार असल्याचा दिलासादायक दावा करण्यात आला आहे.
डेन्मार्क येथून हा दिलासा मिळाला असून ओमीक्रॉन हा या महामारीचा शेवटचा व्हेरिएंट असून ओमिक्रॉन नंतर कोरोना संपणार आहे, हा ओमीक्रॉन कोरोनाला संपविण्यासाठीच आला आहे, त्यानंतर परिस्थितीत पूर्णपणे पहिल्यासारखी होईल असे या दाव्यात सांगण्यात आले आहे. माणसांना आपले जीवन अगदी पूर्वीसारखे जगात येईल असेही म्हटले गेले आहे. 'द सन' ने दिलेल्या वृत्तानुसार हा ओमीक्रॉन व्हेरिएंट देखील लवकरच संपुष्टात येणार असून सद्याचा काळ हा कोरोनाच्या शेवटाचा काळ आहे टायराच्या मतानुसार हा कोरोना आता ६० दिवसांत म्हणजे येत्या दोन महिन्यात पूणपणे संपणार आहे. टायरा हे डेन्मार्कच्या स्टेट सीरम इन्स्टिटयूटमध्ये मुख्य एपिडेमिओलॉजिस्ट आहेत. ओमीक्रॉन संपला की त्यानंतर कोरोनाचा काळही संपणार आहे असा दावा त्यांनी केलेला आहे.
ओमीक्रॉन हा अत्यंत वेगाने पसरतो पण त्याची लक्षणं अगदीच सौम्य प्रकारची दिसून आलेली आहेत. जानेवारी महिन्याच्या अंतिम दिवसात ओमीक्रॉनचा प्रभाव खूपच अधिक असेल पण फेब्रुवारीत त्याचा प्रभाव कमी होणार असून कोरोनापासून सुटका मिळण्याची आशा आता अगदी समोर आली आहे असे आशादायी विधान त्यांनी केले आहे त्यामुळे नक्कीच दिलासादायक आहे. अन्य अभ्यासकांनीही असाच दावा केलेला असून ओमीक्रॉन हा शेवटचाच व्हेरिएंट असेल असे म्हटले आहे. नव्या वर्षात हा कोरोना हा सर्दी, तापासारखा सामान्य होऊन जाणार आहे आणि या कोरोनाचा खात्मा होणार आहे. ओमीक्रॉन व्हेरिएंट म्हणजे कोरोनाच्या विनाशाची सुरुवात आहे अशा सोप्या भाषेत शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे फारशी काळजी करण्याचे कारण आता उरलेले नाही.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासातही अशाच प्रकारचे दिलासा देणारे निष्कर्ष आलेले आहेत. रुग्णालयात दाखल असलेले ओमीक्रॉन रुग्ण तीन दिवसात बरे होतात असे ऑक्सफर्डच्या आरोग्य विभागाचे प्राध्यापक सर जॉन बेल यांनी सांगितले आहे. ओमीक्रॉनचे लक्षणं सौम्य असून ती व्हायरल इन्फेक्शनप्रमाणे आहेत असे बेल यांनी म्हटले आहेत तर काही तज्ज्ञांनी कोरोना व्हायरसच्या म्युटेशनचा पॅटर्न हा स्पॅनिश फ्लू प्रमाणे असल्याचा दावा केला आहे. स्पॅनिश फ्लूच्या दोन लाटा या अथांत भयानक होत्या पण तिसऱ्या लाटेनंतर स्पॅनिश फ्लू संपुष्टात आला आहे.
भारतातील तज्ज्ञांनी आणि जगभरातील तज्ज्ञांनी कोरोनाचा सर्वनाश जवळ आला आहे असेच म्हटले आहे त्यामुळे दिलासा मिळणार आहेच पण सद्यातरी गाफील राहून चालणार नाही. कोरोनाचा नाश होईपर्यंत प्रत्येकाने नियम पाळून काळजी घेणे अत्यावश्यक आहे. ओमीक्रॉन सौम्य असला तरी त्याचा उद्रेक होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. देश आणि विदेशातील तज्ज्ञ , संशोधक, अभ्यासक यांनी कोरोनाचा सर्वनाश अगदी जवळ आल्याचे सांगितल्याने जगभरासाठी हा मोठा दिलासा ठरत आहे.
वाचा > पंढरीत अपघात, मोठी दुर्घटना टळली !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !