BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ जाने, २०२२

लता मंगेशकर यांच्यासाठी प्रार्थना करा !

 



    मुबई : गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्यासाठी प्रार्थना करा असे आवाहन ब्रीच कँडी रुग्णालयात लता दीदींवर उपचार करणारे डॉक्टर प्रतीत समधानी यांनी केले आहे. 


    लता मंगेशकर याना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईच्या बरीच कँडी रुग्णालयात दाखल केले आहे. अतिदक्षता विभागात त्या उपचार घेत असून त्यांना डिस्चार्ज मिळण्यात विलंब लागणार आहे हे या आधीच समोर आले आहे पण आता मात्र त्यांच्या प्रकृतीची काळजी लागलेली आहे. लता मंगेशकर यांच्या वय ९२ वर्षांचे असून त्यांना या वयात कोरोनाची बाधा झाली आहे शिवाय कोरोनाच्या सोबत त्यांना न्यूमोनिया देखील झाला आहे.  दोन वर्षांपूर्वीही त्यांना श्वसनाचा त्रास जाणवला होता शिवाय न्यूमोनियाही झाला होता तेंव्हा त्याना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तब्बल २८ दिवस त्यांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. त्यावेळीही डॉ. प्रतीत समधानी यांनीच त्यांच्यावर उपचार केले होते.  


    घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यामुळे लतादीदींना कोरोनाची बाधा झाली आहे. कर्मचारी सामना ने आण करण्यासाठी घरातून बाहेर पडतात आणि बाहेरून  पुन्हा घरात येत असतात. त्यातील एक कर्मचारी लतादीदींच्या संपर्कात आला होता. घरातील केवळ एकालाच संसर्ग असून त्याच्यापासून लता मंगेशकर याना कोरोनचा संसर्ग झाला आहे.  लता मंगेशकर या अजूनही अतिदक्षता विभागातच असल्याचे  डॉ. समधानी यांनी  सांगतले आहे. त्यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाली असून लतादीदी यांच्यासाठी सर्वोत्कृष्ठ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आल्याची माहीतही त्यांनी दिली आहे. कोरोना सोबत न्यूमोनिया देखील असल्याने त्याना दहा ते बारा दिवस अतिदक्षता विभागातच ठेवले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. लतादीदी याना लवकर बरे होण्यासाठी त्यांच्यासाठी प्रार्थना करावी असे त्यांच्या चाहत्यांसाठी डॉक्टरांनी आवाहन केले आहे. 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !