BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ जाने, २०२२

नया नया पंछी है, थोडा जादा फडफड करता है !


गोंदिया : 'नया नया पंछी है, थोडा जादा फडफड करता है ' अशा मोजक्याच पण नेमक्या शब्दात पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे गोपीचंद पडळकर यांची खिल्ली उडवली असून दोघातील शाब्दिक युद्ध थांबायचे काही नाव घेताना दिसत नाही.


भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे सतत चर्चेत येत असून त्यांच्यावर टीकेची झोडही तेवढ्याच पद्धतीने उठत आहे. आता पुन्हा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पडळकर यांच्या विधानांचा खरपूस समाचार घेतला आहे. एक प्रकारे खिल्लीच उडवली आहे. त्याचबरोबर पडळकर यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत याचा पाढा देखील त्यांनी वाचला आहे. 'टक्केवारीसाठी फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं' अशी राज्य मागासवर्ग आयोगाची अवस्था वडेट्टीवार यांनी केली आहे असा घणाघाती आरोप आ. पडळकर यांनी केला होता त्याला वडेट्टीवार यांनी शेलक्या शब्दात उत्तर देत पडळकर यांची खिल्ली उडवली आहे. 


हिंगोली येथे बोलताना मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्याला काही बोलायचं नाही असं म्हणत मोजक्या शब्दात शेलकी खिल्ली उडवली आहे. 'गोपीचंद पडळकर यांच्यावर लुटमारीचे, फसवणुकीचे गुन्हे आहेत. लोकांची शेती ढापल्याचे गुन्हे आहेत, ज्यांच्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा आहे अशा माणसाबद्धल मला काही बोलायचं नाही' अशा शब्दात त्यांनी हल्ला चढवला.  त्याच्यापेक्षाही पुढे जात वडेट्टीवार म्हणाले, "त्याला ज्ञान नाही, तो नवीन आहे, नया नया पंछी है, थोडा जादा फडफड करता है !"  राज्य मागासवर्ग आयोगाच्या खात्यात पाच कोटी दिले आहेत, ते कशावर खर्च करायचे याचा अधिकार त्यांचा आहे, खाते त्यांचे आणि आणि खर्च करणारेही तेच आहेत. त्यांच्या खात्यावर रक्कम ट्रान्सफर झाली आहे. त्यामुळे तेथे परवानगीची गरजच नसते. अर्धवट आणि चुकीच्या माहितीच्या आधारे पडळकर आरोप करीत असतात त्यामुळे कोणाच्या प्रश्नांना उत्तर द्यायचं ? ज्याच्यावर फसवणुकीचे अनेक गुन्हे आहेत त्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाही' अशी सणसणीत चपराक देखील वडेट्टीवार यांनी लगावली आहे.    


राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आणि ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मागासवर्ग आयोगासाठी ४५० कोटींची घोषणा करून वाहवा मिळवली पण केवळ सडे चार कोटींच दिले आहेत. ही रक्कम दिली पण खर्च करण्यासाठी आयोगाला आदेश देण्यात आलेले नाहीत. वडेट्टीवार यांनी फुकटचं घावलं आणि सारं गाव धावलं अशी राज्य मागासवर्ग आयोगाची अवस्था केली आहे असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला होता.    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !