BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ जाने, २०२२

सोळा महिन्याच्या मुलीवर बापाकडून आधी बलात्कार, नंतर खून !

 





सोलापूर : पवित्र आणि विश्वासाच्या नात्याला पुन्हा एकदा कलंक लागला असून बापानेच आपल्या अवघ्या सोळा महिन्याच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना सोलापूर येथे उघडकीस आली आहे 


नाती ही पवित्र आणि विश्वासाची असतातच पण अत्याचारालाही काही वय असतं. या सगळ्याच गोष्टी संपुष्टात आल्याचे दाखविणाऱ्या घटना अलीकडे सातत्याने घडत आहेत. बाप आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करतो हे आता या दुनियेत नवे राहिले नाही. माणूस म्हणवून घेण्याची लायकी नसणारी माणसं समाजात अशा विकृतीचे वर्तन करीत आहेत त्यामुळे नात्यातला पवित्रपणा आणि मजबूत विश्वास केंव्हाच नष्ट झाला आहे. आता तर बापाने आपल्या अवघ्या १६ महिन्याच्या मुलीवर बलात्कार करून नंतर तिचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. केवळ सोलापूर लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि रेल्वेतील प्रवाशांच्या चाणाक्षपणामुळे या नराधमाच्या काळ्याकुट्ट प्रकारावर प्रकाश पडला आणि धक्कादायक बाब समोर आली. 


पाशवी प्रवृत्तीचा हा नराधम आणि त्याची पत्नी मयत मुलीचा मृतदेह घेऊन सिकंदराबाद - राजकोट या रेल्वेने निघाले होते, सोलापूर रेल्वे पोलिसांना शंका आल्याने त्यांनी अधिक चौकशी केली असता हे वेगळेच आणि धक्कादायक सत्य बाहेर आले. मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नराधम आणी त्याची पत्नी मृतदेह घेऊन आपल्या मूळ गावी  निघाले होते. राक्षसी प्रवृत्तीच्या पाशवी नराधमासह त्याची पत्नीही होती आणि पतीने केलेले महापाप लपविण्यात तिचा सहभाग होता. पतीला वाचविण्यासाठी माहित असूनही गुन्हा लपविण्याचा आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या कटात ती देखील सहभागी असल्याचे दिसून आले. 


सिकांदाराबाद येथे मोलमजुरी करण्यासाठी गेलेल्या नराधमाने आपल्याच सोळा महिने वयाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर तिचा गळा आवळून खून केला, त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घेऊन गुपचूपणे ते आपल्या मूळ गावी राजस्थानकडे निघालेले असतानाच सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी त्यांना पकडले. हा नराधम आपल्या पत्नीसह आणि छोट्या मुलीसह हैद्राबाद येथे राहत होते. पिडीत मुलीची आई आणि लहान मुलगा रात्री झोपी गेलेले असताना बापाने या मुलीवर अत्याचार करून तिचा जीव घेतला.सिकंदराबाद - राजकोट रेल्वे एक्स्प्रेसने ते निघाले असता प्रवाशांना संशय आला आणि त्यांनी वाडी येथे आल्यावर पोलिसांशी संपर्क साधला पण या स्थानकावर रेल्वे अधिक वेळ न थांबता पुढे निघून गेली पण सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी त्यांना पकडले आणि नंतर सत्य बाहेर आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांनीच या घटनेची फिर्याद दिली असून गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा आता हैदराबाद पोलिसांकडे वर्ग केला जाणार आहे. 


वाचा> क्लिक करा  >> दोन महिन्यात कोरोनाचा सर्वनाश अटळ !    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !