नवी दिल्ली : लस टोचून घेण्यास ज्यांना भीती वाटते त्यांच्यासाठी आता एक चांगली बातमी आली असून आता नाकावाटे देखील कोरोनाची लस घेता येणार आहे. केंद्र शासनाने अशा लसीसाठी आता मंजुरी दिली आहे.
कोरोनाची लस उपलब्ध होऊन वर्षभराचा कालावधी झाला तरी अद्याप लाखोंच्या संख्येने असे लोक आहेत की ज्यांनी अद्याप कोरोनाची लस घेतली नाही. कुणी पहिला डोस घेतला आणि दुसऱ्या डोससाठी फिरकलेच नाहीत तर कुणी अद्याप पहिलाच डोस घेतला नाही. दंडात लस टोचून घ्यायची अनेकांना भीती वाटत असल्याचे देखील या लसीकरण मोहिमेत दिसून आले आहे. पण आता थेट नाकातून कोरोनाची लस दिली जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नाकावाटे लस देण्याचा विषय गेल्या काही काळात अनेकदा चर्चिला गेला पण आता केंद्र सरकारने अशा लसीला मंजुरी दिली आहे.
भारतात दिल्या जाणाऱ्या लसी या इंजेक्शनच्या द्वारे दिल्या जातात. हीच लस नाकावाटे घेण्याची सोय आता झाली आहे. भारत बायोटेकच्या अशा ( intranasal Booste Dose ) लसीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांनी या लसीच्या ट्रायलसाठी परवानगी दिली आहे. डीसीजीआयच्या सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटीने कंपनीच्या या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील बुस्टर डोस ट्रायलसाठी ही प्राथमिक मजुरी दिली असून भारतातील ही पहिलीच लस ठरणार आहे. ओमीक्रोनसह कोरोनाच्या अन्य व्हेरीएंटलाही रोखण्याची क्षमता या लशीत असल्याचे सागितले गेले आहे. संपूर्ण जगात अशा लशीची मागणी असल्याचे भारत बायोटेकचे कृष्णा इल्ला यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !