BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२८ जाने, २०२२

भय्यू महाराज आत्महत्येप्रकरणी तिघांना शिक्षा !

 



इंदूर : अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी त्यांच्या जवळच्याच तिघांना इंदूर जिल्हा न्यायालयाने जबाबदार धरले असून तिघांना प्रत्येकी सहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.  


भय्यू महाराज यांनी १२ जून १९१८ रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. ही घटना समोर आली तेंव्हा यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता. हा घातपात असावा अशी शंकाही अनेकांनी व्यक्त केली होती परंतु नंतर भय्यू महाराज यांनी आम्हात्या करण्यापूर्वी लिहिलेली एक चिट्ठी आढळली होती त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. त्यांच्या आत्महत्येप्रकरणी जानेवारी २०१९ मध्ये पोलिसांनी तिघांना अटक केली होती. यात भय्यू महाराज यांचा प्रमुख सेवक असलेला विनायक दुधाळे, चालक शरद देशमुख  आणि एक शिष्य  पलक पुराणिक यांचा समावेश होता. विनायक हा महाराजांचा १६ वर्षापासूनच एकनिष्ठ सेवक म्हणून ओळखला जात होता. त्यालाही अटक करण्यात आल्याने त्यावेळी बरीच चर्चाही झाली होती.


भय्यू महाराज यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने या तिघानाही दोषी धरले आणि सदर आरोपी पैशासाठी महाराजांचा छळ करीत होते हे देखील न्यायालयाने मान्य केले आहे. या तीनही आरोपींना भारतीय दंड विधान कलम ३०६ नुसार दोषी धरून न्यायालयाने प्रत्येकी सहा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.  भय्यू महाराज यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती तेंव्हा सुरुवातीला कौटुंबिक कलहातून त्यांनी आत्महत्या केली असावी किंवा नैराश्यातून त्यांनी हे पाउल उचलले असावे अशा शक्यता व्यक्त करण्यात येत होत्या. कारण आत्महत्या करण्याची घटना घडण्याच्या आधीच काही महिने त्यांनी आपण सामाजिक आणि अध्यात्मिक कार्यातून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले होते. 


पोलिसांनी या आत्महत्या प्रकरणी तीन जणांना अटक केली होती आणि यात एका तरुणीचाही समावेश होता. भय्यू महाराज यांचा सेवक विनायक दुधाळे शरद देशमुख यानाही अटक करण्यात आली होती. यावेळी अटक करण्यात आलेल्या तरुणीने भय्यू महाराज यांच्याकडून लाखो रुपये हडप केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी साडे तीन वर्षे सत्र न्यायालयात सुरु होती आणि त्यानंतर आज हा निकाल आला आहे. विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक पुराणिक हे पैशासाठी महाराजंचा छळ करीत होतेच परंतु पैशासाठी त्यांना ब्लॅकमेल देखील करण्यात आले होते. भय्यू महाराज याना आपल्या कुटुंबांपेक्षाही या सेवेदारावर अधिक विश्वास होता. त्यांनी आपला आश्रम त्यांच्यावर सोपवला होता पण त्यांनीच एवढा त्रास दिला की त्यांना आत्महत्या करावी लागली.  साडे  तीन वर्षे सुरु असलेल्या या सुनावणीत न्यायालयात ३२ साक्षीदार तपासण्यात आले आणि तिघांना दोषी धरून आज शिक्षा सुनावण्यात आली 



भय्यू महाराज हे एक बडे प्रस्थ होते त्यामुळे त्यांच्या आत्महत्या करण्याच्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली होती. देशातील अनेक राजकीय नेते आणि चित्रपट अभिनेते भय्यू महाराजांचे अनुयायी होते. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख, देवेंद्र फडणवीस, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील हे देखील भय्यू महाराज यांच्याकडे जात होते. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !