BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ जाने, २०२२

पंढरपूर तालुक्यात सहज लागले भांडण आणि एकाचा झाला मृत्यू !

 




पंढरपूर : द्राक्ष छाटणीसाठी आलेल्या मजुरात सहज किरकोळ भांडण लागले आणि यात एका मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पंढरपूर तालुक्यातील कासेगाव शिवारात घडली आहे.


मारामारी अथवा हल्ला करून दुसऱ्याचा जीव घेणे ही वेगळी बाब आहे पण या घटनेत आश्चर्यजनक मृत्यू झाला आहे. अर्थात हा मृत्यू होण्याचे नेमके कारण वैद्यकीय अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. येळावत, किल्लारी येथील दत्तात्रय संभाजी गायकवाड या द्राक्ष छाटणी मजुराचा मृत्यू झाल्याने त्याची पत्नी राधा गायकवाड यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार द्राक्ष बागांची छाटणी करणे तसेच यासंबंधित अन्य कामे करण्यासाठी लातूर जिल्ह्यातून मजुरांच्या काही टोळ्या पंढरपूर तालुक्यात आलेल्या आहेत. खर्डी, कासेगाव, अनवली परिसरात हे मजूर द्राक्षबागात काम करीत आहेत. मुकादम दत्ता जाधव याच्या टोळीत दत्तात्रय गायकवाड आणि त्यांची पत्नी राधा गायकवाड हे गेल्या चार महिन्यापासून असून ते खर्डी येथे राहतात. तर गायकवाड यांची दुसरी पत्नी राजकन्या ही गावाकडेच आहे. 


पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे राहणारे मुकादम तानाजी भालेराव यांच्या मुलाचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त भालेराव यांनी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी सर्व मुकादम आणि वेगवेगळ्या टोळीतील मजुरांना जेवणासाठी कासेगाव येथील भुसे वस्ती येथे  बोलाविण्यात आले होते. भालेराव यांनी मजुरांना येण्यासाठी वाहने पाठवली होती आणि या वाहनातून दत्तात्रय गायकवाड आणि त्यांची पत्नी राधा गायकवाड हे देखील येथे आले. सदर ठिकाणी दत्तात्रय यांना त्यांचा चुलत  मेहुणा तुकाराम लोंढे यांनी बाजूला बोलावून जवळच असलेल्या गोदामाकडे नेले. आणि तुकाराम हा दत्तात्रय याला जाब विचारू लागला. 'तू माझ्या बहिणीला मुलासह गावी ठेवले आहेस आणि हिला घेऊन का फिरतोस ?' असा सवाल केला. 


दत्तात्रय गायकवाड आणि मेहुणा तुकाराम लोंढे यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली आणि हा वाद वाढत गेला. दोघे हमरातुमरीवर आले आणि एकमेकांना धक्काबुक्कीही करू लागले. दोघांत शिवीगाळ होऊ लागली. याच धक्काबुक्कीत दत्तात्रय खाली पडला. तो तोंडावर खाली पडल्याने बेशुद्ध झाला आणि जागेवरच मृत्युमुखी पडला

    

 निलंगा तालुक्यातील शिडूळ येथील असलेल्या तुकाराम लोंढे याच्याविरुद्ध दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मजुरांच्या सगळ्याच टोळ्या हादरल्या आहेत. मजुरी करून उपजीविका करण्यासाठी लातूर जिल्ह्यातून पंढरपूर तालुक्यात आलेल्या एका मजुराचा जीव गेला तर दुसयाला तुरुंगात जाण्याची पाळी आली आहे. 


वाचा : क्लिक करा :> प्रणिताताई भालके गरजल्या, म्हणाल्या, '----'



   




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !