BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ जाने, २०२२

प्रणिताताई भालके गरजल्या, 'महिलांना कमी समजू नका' !

 


पंढरपूर : 'महिला सशक्त, समर्थ आहेत, त्यांना कमी समजू नका. सन्मान आणि समानतेचा दर्जा द्या' अशा शब्दात डॉ. प्रणितीताई भालके गरजल्या. उपस्थितांनी त्यांना उत्स्फूर्त दाद देखील दिली. 


राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या ४२४ व्या जयंती निमित्त संभाजी ब्रिगेड पंढरपूर तर्फे आज जिजाऊ पुतळ्याचे पूजन डॉ प्रणिताताई भालके यांच्या शुभहस्ते व जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा  सगुणाताई शेडगे  यांच्या अध्यक्षतेखाली माजी नगराध्यक्ष साधनाताई भोसले, माजी नगरसेविका सारिकाताई साबळे, श्रेयाताई भोसले, सुमनताई पवार, शुभांगीताई जाधव, शुभांगीताई भुईटे, संभाजी ब्रिगेड पुणे विभाग अध्यक्ष किरण घाडगे, धनंजय मोरे, आकाश पवार, पुरूषोत्तम देशमुख, नगरसेवक प्रशांत शिंदे, सतिश शिंदे, नागेश यादव, महमंद उस्ताद, शिवाजी मस्के, मुन्ना भोसले, आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी प्रणिताताई भालके, साधनाताई भोसले, आदिती घाडगे,मनाली मोरे यांनी आपले विचार व्यक्त केले. 

     

ब्रिगेडच्या वतीने आज खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान करण्यात आला आणि याचे अनेकांनी कौतुक केले. राजकारणातील पदाधिकारी महिलांचा सन्मान, सत्कार तर नेहमीच होतात पण ब्रिगेडने आज नगरपरिषदेतील महिला सफाई कामगारांचा सन्मान करून त्यांना आपलेपणाची वागणूक दिली. अनेक कार्यक्रम होत असतात पण या महिलांकडे केवळ सफाई कामगार म्हणूनच पहिले जाते. आपलाही सत्कार होताना पाहून कामगार महिला भारावून गेल्या होत्या !   





यावेळी नगरपरिषदेच्या महिला सफाई कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेड बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.  डॉ. प्रणिताताई या नेहमीच समाजात मिसळत असतात आणि सामान्य जनतेच्या समस्या जाणून घेण्यात त्यांना नेहमीच रस असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी या कार्यक्रमात बोलताना सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. 


 


यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, "आजही राज्यांमध्ये स्त्रीयांसाठी शक्ती कायदा करूनही अन्याय थांबलेला नाही, समाजाने स्त्रीला पाहाताना दृष्टिकोन बदलला पाहिजे, महाराष्ट्र सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या जयंती पासून 'राष्ट्रमाता जिजऊ यांच्या जयंतीपर्यंत 'दशरात्रौउत्सव' साजरा करायचे ठरवले आहे, यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे, स्त्रीयांना कमी समजू नका, सन्मान आणि समानतेचा दर्जा द्या" जिजाऊ यांच्या पुतळ्याबाबत बोलताना त्यांनी पंढरपूर नगरपालिकेच्या  राष्ट्रपुरुषावरील नकली प्रेमावर  जोरदार हल्ला चढवला.  राष्ट्रमाता जिजाऊ यांचा पुर्णाकृती पुतळा तयार असूनसुद्धा नगरपरिषदेने चबुतरा बांधून दिला नाही, लोकशाही आण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा तयार आहे पण नगरपरिषदेने आजपर्यंत बसवायला परवानगी दिली नाही, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास परवानगी दिली नाही, देखभाल दुरुस्ती केली जात नाही,  हा महापुरुषांचा अपमान केला जात आहे, जिजाऊ च्या लेकीनी जिजाऊ माँ साहेबांची  प्रेरणा घेऊन महिलांनी आपले कुटुंब, समाज घडविण्यासाठी पुढे आले पाहिजे असे आवाहन केले. 



खालील बातमीवर क्लिक करा :


हे देखील वाचा : चमत्कार लसीचा ! मुका पुन्हा बोलू लागला !



हे वाचाच :> भैया देशमुख यांनी घेतली पोलीस निरीक्षकाची 'विकेट' ! 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !