BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ जाने, २०२२

कोरोनामुळे २६५ पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू ! पोलिसात कोरोनाचे आक्रमण !

 



मुंबई : कोरोना कालावधीत आत्तापर्यंत महाराष्ट्र पोलीस दलातील २६५ पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून गेल्या काही दिवसांत पुन्हा शेकडो पोलीस कोरोनाबाधित झालेले आहेत त्यामुळे पोलिसात मोठी चिंता आहे. 


कोरोनाने प्रत्येकावरच मोठे संकट आणले असले तरी पोलीस आणि आरोग्य यंत्रणा यांना कोरोनाच्या आक्रमणाला सतत सामोरे जावे लागत आहे. जनतेच्या आरोग्याचे रक्षण करता करता त्यांचेच आरोग्य धोक्यात येत आहे. अनेक लोक प्रतिनिधी  देखील कोरोना बाधित झालेले आहेत त्यामुळे एकूण चिंतेचे वातावरण सगळीकडेच आहे. सेवा बजावता बजावता   आत्तापर्यंत महाराष्ट्र पोलीस दलातील २६५ पोलिसांचा कोरोना बळी गेला आहे तर शेकडो पोलीस सद्या कोरोना बाधित आहेत. मृत्यू झालेल्या पोलिसात मुंबईचे १२६ कर्मचारी आहेत. १४५ पोलीस कर्मचाऱ्यावर उपचार सुरु आहेत. 


गेल्या २४ तासात महाराष्ट्रात तब्बल ३७० पोलीस कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. यात ६० अधिकारी यांचाही समावेश आहे. आत्तापर्यंत २ हजार १०० पोलिसांना कोरोनाची लागण झालेली आहे. मुंबईमध्येच ७४१ पोलीस कर्मचारी उपचार घेत आहेत.  कोरोनाची सुरुवात झाल्यापासून पोलिसांना अधिक धोका झाला आहे आणि आजही ते धोक्यातच आहेत. कोरोनाची सुरुवात झाल्यापासून दोन वर्षात ४८ हजार ६११ पोलीस कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. यात ६ हजार २०४ अधिकारी आणि ४२ हजार ४०७ कर्मचारी यांचा समावेश आहे. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात ३७० पोलीस कर्मचारी कोरोना बाधित आढळले आहेत. पोलीस दलात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पोलीस दल चिंतेत असून त्यांना काम तर करावे लागत आहे. रस्त्यावरचे त्यांचे काम असल्याने रोज अनेकजण साम्प्रकात येतात आणि पोलिसाना कोरोनाचा संसर्ग होत आहे. 


सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी आपले आरोग्य संकटात घालणाऱ्या खाकी वर्दिलाच आता कोरोनाने त्रस्त केले असून न्यायालयातही कोरोनाने घुसखोरी केली आहे. शेकडो पोलीस कोरोना बाधित होत असून संसद , न्यायालय अशा ठिकाणीही कोरोनाचे आक्रमण सुरु आहे. कोरोनाचे आक्रमण आल्यापासून पोलीस आणि आरोग्य यंत्रणा यांच्यावर प्रचंड ताण पडत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत तर प्रचंड विनाश झाला आहे. संचारबंदीच्या काळात पोलीस यंत्रणेने अविरत परिश्रम घेतलेले आहेत आणि आत पोलिसांच्या आरोग्याला मोठा धोकाही झाला आहे. सगळीकडेच कोरोना फोफावत असताना पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बाधित होत आहेत. जनतेच्या सुरक्षेची काळजी घेता घेता पोलिसांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोनाचा जसजसा प्रभाव वाढीला लागला आहे तसतसे बाधीत पोलिसांच्या आकड्यातही वाढ होऊ लागली आहे. 


बडे अधिकारीही बाधित !


पोलीस कर्मचारी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारीही बाधित झाले आहेत. कोरोना आणि ओमीक्रॉन यांचा संसर्ग वेगाने पसरत असतानाच मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. अपर पोलीस आयुक्त दिलीप सावंत, संदीप कर्णिक, सत्यनारायण चौधरी, उपायुक्त डॉ. हरी बालाजी, गीता चव्हाण, सोमनाथ घार्गे, विशाल थकून, दत्ता नलावडे, प्रकाश जाधव, शिवाजी राठोड, नितीन पवार, सुनील भारद्वाज हे अधिकारी तर गृह विलगीकरणात आहेत. अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी देखील मोठ्या संख्येने बाधित होऊ लागले आहेत. मोटार परिवहन विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र भाटी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर आर आर रेडकर या पोलिसांचा देखील मृत्यू झाला आहे  दल चिंतेत आहे.  मुंबई, ठाणे, पुणे येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बाधित होत असल्याचे दिसून आले आहे. 


पोलीस रोज बाधित होत असताना सर्वोच्च न्यायालयातही कोरोनाने घुसखोरी केली आहे. सर्वोच्च न्यायालयातील १५० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून चार न्यायाधीश देखील बाधित झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील ३२ न्यायाधीशांपैकी ४ न्यायाधीश कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे दोन आठवड्यांसाठी सर्व सुनावणी डिजिटल पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस, न्यायालय आणि संसदेत देखील कोरोनाची बाधा होताना आढळून येत आहे. संसदेत काम करणारे ४०० कर्मचारी बाधित झाले आहेत. रोजचे आकडे हे भयावह स्थितीत पोहोचू लागले असून दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक पटीने तिसऱ्या लाटेतील प्रसार सुरु असल्याचे रोजचे आकडेच सांगू लागले आहेत. 


वाचा : क्लिक करा :> प्रणिताताई भालके गरजल्या, म्हणाल्या, '----'

 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !