BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ जाने, २०२२

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर 'फसवणूक' आणि 'ऍट्रॉसिटी' चा गुन्हा !


जमीन खरेदी व्यवहारात
फसवणूक केल्याची तक्रार
 


आटपाडी  : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बनावट कागदपत्र देऊन फसवणूक केल्याचा आरोपी करीत केलेल्या तक्रारीवरून आटपाडी पोलिसांनी पडळकर  विरोधात फसवणूक आणि ऍट्रॉसिटीसारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्या विरोधात झरे येथील महादेव वाघमारे यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आटपाडी तालुक्यातील झरे येथे वाघमारे यांच्या मालकीची जमीन आहे. गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी गट क्रमांक ६२४, ५५६. ५५७ ही जमीन खरेदी करण्याची तयारी दाखवली त्यामुळे या दोघांना ही जमीन दाखविण्यात आली. फिर्यादी वाघमारे आणि पडळकर यांच्यात या जमिनीचा व्यवहार ६ लाख २० हजार रुपयात ठरला. त्यानुसार पडळकर बंधूनी या जमिनीचा खरेदी दस्त २१ मार्च २०११ रोजी करून घेतला. पण यावेळी बनावट कागदपत्रे तयार करून वाघमारे याना १ लाख ६० हजार रुपये देण्यात आले होते.  उर्वरित चार लाख साठ हजार रुपयांची रक्क्म तीन ते चार महिन्यात देण्याचे ठरले होते. 


ठरल्याप्रमाणे जमिनीचा व्यवहार झाला पण उरलेली रक्कम पडळकर यांनी वाघमारे याना दिलीच नाही. २०११ साली झालेल्या या व्यवहारातील उरलेले  ४ लाख ६० हजार रुपये आजवर पडळकर यांनी दिलेच नाहीत. वारंवार मागणी करूनही वाघमारे याना ही रक्कम मिळालाय नाही त्यामुळे त्यांनी आटपाडी पोलिसांकडे धाव घेतली आहि आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या बंधूविरोधात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून आटपाडी पोलिसांनी गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या बंधू यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ४२०, फसवणूक आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध  कायद्यांतर्गत ऍट्रॉसिटी असा गुन्हा दाखल केला आहे.      


फिर्यादी वाघमारे यांचा भाऊ विश्वास, बहिण शांताबाई कदम, बहिण विनंता खरात यांची मुलगी मंजुश्री खरात, सौ. मनीषा खरात, मुलगा धनंजय खरात यांच्या मालकीची असणारी झरे येथील गट क्र. ६२४ मधील १२ एकर आणि गट ५५६ मधील २६ गुंठे जमीन कुलमुखत्यार पत्राच्या आधारे पडळकर यांनी घेतली होती.  जवाहर योजनेतील विहिरीच्या पाण्यावर आणि बिहीरीच्या वीज जोडणीवर देखील अतिक्रमण करून आजवर पाणी पुरवठा पाईपचा बेकायदेशीर, विनामोबदला वापर केला अशा प्रकारची तक्रार वाघमारे यांनी केली आहे. जमीन खरेदी करताना शासकीय मुद्रांक फीसाठी येणारा खर्च कमी करून कमी किमतीत जमीन घेतल्याचे दाखविण्यात आल्याचा आरोपही महादेव वाघमारे यांनी केला आहे. 


आधीचे १४ गंभीर गुन्हे !


नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरील गंभीर गुन्ह्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. कायदा सुव्यवस्था याबाबत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देण्ताना गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी विरोधकांचे मुद्दे खोडून काढले होते. भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आटपाडी तालुक्यात गंभीर स्वरूपाचे १४ गुन्हे दाखल आहेत, बोगस लोक आणि खातेदार उभे करून देवस्थानच्या जमिनी हडप केल्याच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असून जमिनी हडप करण्याच्या प्रकरणांची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्याचा मांस असल्याचे त्यांनी सांगितले होते.  ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत तेच सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यातील तीन आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित कार्याला निघालेत असा टोमणाही गृहराज्यमंत्री देसाई यांनी लगावला होता. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !