BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ जाने, २०२२

झाडल्या गोळ्या ! जीव वाचविणाऱ्या डॉक्टरलाच घातल्या गोळ्या !



यवतमाळ : डॉक्टर मंडळी कसोशीने प्रयत्न करून माणसांचे प्राण वाचवतात पण अशा डॉक्टरांवरच आज दोघांनी गोळ्या झाल्या आणि त्यांचाच जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे.


डॉक्टरांना नेहमीच परमेश्वराचा एक अंश मानले जाते आणि ते अनकेदा अनुभवायला मिळते. कोरोनाने आक्रमण केल्यापासून तर केवळ डॉक्टर हाच परमेश्वर बनला आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांनी आपले जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली आहे आणि अजूनही करीत आहेत. शक्यतो डॉक्टर कुणाचा शत्रूही असत नाही. असे असले तरी आज यवतमाळ येथील एका डॉक्टरवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. उमरखेड येथील उत्तरवार रुग्णालयाच्या परिसरात डॉक्टर हनुमंत धर्माकारे यांच्यावर गोळीबार झाला. रुग्णांची सेवा करून डॉक्टर रुग्णालयातून घरी निघाले होते. याचवेळी अचानक दुचाकीवरून दोन तरुण आले आणि त्यांनी डॉक्टरांवर बेछूट गोळीबार केला. रुग्णालयाच्या समोरच ही घटना घडली. डॉक्टर धर्मकारे यांना याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हल्लेखोर मात्र गोळ्या झाडून पळून गेले आहेत. परिसरातील नागरिकांनी दोन हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु ते दुचाकीवर असल्याने पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.  


रुग्णालयाच्या परिसरात आणि डॉक्टरवर गोळ्या झाडण्याच्या या प्रकाराने जिल्हाभर खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले आणि पुढील कार्यवाही सुरु केली आहे. डॉक्टरवर कुणी गोळ्या झाडल्या असाव्यात आणि याचे कारण काय असावे याचा कुणालाच अंदाज आलेला नाही. दोन हल्लेखोरांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखला केला असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी तातडीने नाकाबंदी केली आहे.   

 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !