BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ जाने, २०२२

सोलापुरात आढळला पहिला ओमीक्रॉन रुग्ण ! चिंता वाढली !!

 

 


सोलापूर : राज्यात ठिकाणी ओमीक्रॉन रुग्ण आढळत असताना आता सोलापूर जिल्ह्यातील पहिला रुग्ण आढळून आला असून एकूण दोन रुग्ण सोलापुरात आढळले आहेत. यामुळे अधिक चिता वाढली आहे


कोरोनाचे रुग्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्यात वाढत होते पण ओमीक्रॉन चा अजून शिरकाव झालेला नव्हता. सोलापूरच्या आजूबाजूच्या जिल्ह्यात असे रुग्ण आढळले होते पण सोलापूर जिल्ह्यात रुग्ण नसल्याने दिलासादायक चित्र होते पण आता हा पहिला रुग्ण मिळाला आहे आणि जिल्ह्याची काळजी अधिक वाढली आहे. 


प्राप्त माहितीनुसार सदर रुग्णाची टेस्ट २७ डिसेंबर रोजीच पॉझिटिव्ह  आलेली होती. सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात ३० डिसेंबर पर्यंत हा रुग्ण उपचार घेत होता. त्यानंतर त्याना मुंबई येथे हलविण्यात आले २ जानेवारी पर्यंत ते तेथेच दाखल होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. नंतर ते आत्तापर्यंत गृह विलगीकरणात आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असून कुठल्याही प्रकारे लक्षण  नाहीत. त्यांच्या कुटुंबातील अन्य कुणी व्यक्ती पॉझिटिव्ह नसून त्यांच्या संपर्कात आलेली एका व्यक्ती पॉझेटिव्ह आली होती पण त्यांच्या कुटुंबातही दुसरे कुणी बाधित आढळले नाही. सदर व्यक्तीचा १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधीही पूर्ण झालेला आहे. त्यामुळे या रुग्णापासून धोका होण्याची शक्यता खूप कमी असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले गेले आहे. एकूण दोन रुग्ण सोलापूर शहरात आढळले असले तरी ते पुर्ण बरे झाल्यावर ही बातमी बाहेर आली आहे.



पहिल्या तीन दिवसात अधिक प्रसार होण्याची शक्यता असते. नंतर मात्र तो पॉझिटिव्ह आला तरीही त्याच्यापासून प्रसार होत नाही अशी माहितीही देण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसले तरी कोरोनाचे नियम पाळून आपल्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घेणे मात्र आवश्यक आहे.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !