BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ जाने, २०२२

बापानं लेकीला दिला गळफास आणि पोलिसात बनला फिर्यादी !

 


नाशिक : पोटच्या चिमुकल्या पोरीला जंगलात नेऊन बापानेच फाशी दिलं आणि पोलिसात मात्र फिर्यादी झाला पण अवघ्या २४ तासात दोरीच्या एका तुकड्यानं या  कारस्थानाचं बिंग फोडलं आणि बापाच्या पापाला वाचा फुटली. 


नाशिकच्या दिंडोरी तालुकयातील देहेरवाडी गावाच्या परिसरात जंगली भागात एका झाडाला एका चिमुकल्या मुलीला गळफास घेतल्याच्या अवस्थेत लटकताना काही लोकांना दिसून आले. मुलगी लहान होती त्यामुळे आत्महत्येचा तर हा विषयच नव्हता मग या मुलीला अशा प्रकारे कुणी मारले असेल हा एक गहन प्रश्न होता. गळफास दिला असला तरी मुलगी अजूनही अत्यवस्थ होती त्यामुळे घाई करून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. चिमुकली मुलगी फासावर लटकविल्याची बातमी वेगाने जिल्हाभर पसरली आणि जिल्ह्यात या घटनेची खळबळ उडाली. हा काय प्रकार असावा याचा उलगडा कुणालाच होत नव्हता. मुलगी शुद्धीवर आल्यावरच काही धागेदोरे मिळण्याची शक्यता होती. पोलिसानी तिच्या कुटुंबियांना बोलावून तिची ओळख पटवून घेतली पण बाकीची काहीच दिशा स्पष्ट नव्हती. या मुलीच्या बापानेच अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गंभीर गुन्हा असल्याने पोलिसांनी वेळ न दवडता तपास सुरु केला पण तपासात जे सत्य समोर आले त्याने पोलिसही चक्रावून गेले. 


रुग्णालयात या मुलीच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची चाणाक्ष नजर कामाला आली. मुलगी खाणाखुणा करून जे काही सांगू पाहात होती त्यावरून तिच्या बापाचेच हे कारस्थान असल्याची शंका या पोलिसाला आली आणि त्याला आलेली शंका त्याने पोलीस अधीक्षक याना दिली. प्रकरण अधिक गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक यांनीच या घटनेचा तपास सुरु केला. या चिमुकल्या मुलीला झाडाला गळफास देताना वापरलेल्या नॉयलॉन दोरीचा काही भाग या मुलीच्या घरी आढळून आला. या दोरीमुळे आरोपी हा मुलीच्याच घरातला आहे याची जाणीव पोलिसाना झाली. दोरीनेच खुनाचे रहस्य उलगडण्यास सुरुवात केली होती. त्या दोरीच्या आधाराने पोलिसांनी आपला तपास तिच्या घरीच केंद्रित केला आणि हा तपास तिच्या बापाजवळ येऊन थांबला. 


याच क्रूरकर्मा बापाने मुलीच्या अपहरणाचा बनाव रचून मुलीला जंगलात नेऊन फासावर दिल्याचं स्पष्ट झालं. अज्ञातांविरोधात पोलिसात फिर्याद देणारा बापच आरोपी असल्याने पोलिसाने त्याला बेड्या ठोकल्या. दुसऱ्या पत्नीच्या विरोधामुळे त्याने या मुलीचा काटा काढण्याचा प्लॅन केला होता. पोलिसांनी मात्र अवघ्या चोवीस तासात या धक्कादायक आणि नाशिक जिल्ह्याला हादरा दिलेल्या घटनेचा तपास लावला. या कटात आणखी कोण कोण सहभागी आहे याचा तपास आता पोलीस करीत आहेत.  


हे देखील वाचा : बापाबेच विष पाजून कापले बायको, मुलांचे गळे !     


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !