BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ जाने, २०२२

तीन चार दिवसात सोलापूर जिल्ह्यात कडक निर्बंध !

 




सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लवकरच निर्बंध आणखी कडक केले जातील असे स्पष्ट संकेत आज पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आता या निर्बंधाला सामोरे जावे लावणार हे जवळपास निश्चित आहे. 


नव्या वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून रोज मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. शासन पातळीवर लॉकडाऊन करणार नाही पण निर्बंध कडक करावे लागतील असे सगळेच मंत्री  सांगत आहेत आणि तशी परिस्थितीही निर्माण होत आहे. मुंबई पुणे येथे तर मिनी लॉकडाऊनसारखे सगळेच निर्बंध लागू करण्यात येत आहेत. पुणे मुंबई येथे कोरोनाची वाढ अधिक आहे पण आता सोलापूर जिल्ह्यातील रुग्णांच्या वाढीचा आलेख देखील चढता आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सोलापूर जिल्हात कोरोनाचे रुग्ण चढत्या क्रमानेच आहे. 


सोलापूर शहर आणि जिल्यात येत्या तीन दिवसांत निर्बंध आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे . रुग्ण वाढत राहिले तर नाईलाजाने निर्बंध कडक करावेच लागतील असे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी आज स्पष्ट सांगितले आहे. शहर आणि जिल्ह्यातील रुग्ण दररोज वाढतच आहेत. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्हा नियोजन भवनात आज कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेतली आणि त्यानंतर पत्रकाराशी बोलताना त्यांनी निसंदिग्ध माहिती दिली. निर्बंधाबाबत रुग्णसंख्या पाहून तीन दिवसांत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. 


रुग्णांची संख्या वाढत गेली तर शहर आणि ग्रामीण  भागातील शाळा बंद  करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, भविष्यात आठवडा बाजार बंद करावे लागतील तसेच शनिवारी आणि रविवारी अधिक गर्दी होत असते त्यामुळे शनिवार रविवारवर निर्बंध आणावे लागतील असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यी सांगितले.  अशा निर्बंधाचे निर्णय आज आपण घेतलेले नाहीत, अजून जिल्ह्याची परिस्थिती आटोक्यात आहे पण परिस्थिती आटोक्याच्या बाहेर गेली तर नाईलाजाने आपल्याला हे निर्णय घ्यावे लागतील. निर्बंध लावण्यात आपल्याला आनंद नाही पण रुग्णांची संख्या पाहून सोमवारी जिल्हाधिकारी आणि आयुक्त मिळून निर्णय घेतील. निर्बंध लावण्यासाठी नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित आहे. मागील दोन्ही लाटेत नागरिकांनी खूप चांगले सहकार्य दिले आहे आणि म्हणूनच आपण कोरोनाला आटोक्यात आणू शकलो, कोरोनाला रोखु शकलो असेही यावेळी बोलताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे.  सोलापूर जिल्हातील रुग्णांची संख्या वाढतच निघाली आहे त्यामुळे येत्या तीन चार दिवसात जिल्हाधिकारी नवे निर्बंध लागू करण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !