पुणे : देशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना निर्बंधाची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु असून आज याबाबत फैसला होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने जगणे कठीण करून ठेवले असताना पुन्हा या विषाणूने हातपाय पसरले आहेत. निर्बंध, संचारबंदी, लॉकडाऊन या सगळ्यांना जनता वैतागली असून पुन्हा निर्बंध लावण्याची वेळ आली आहे. मुंबईसह राज्यात कोरोना सुसाट असून कडक निर्बंध लावावे लागतील असे राज्याचे अनेक मंत्री सांगत आहेत. निबंध म्हटले की लोकांच्या काळजाचा थरकाप होऊ लागला आहे. दोन वर्षापासून अर्थचक्र कोरोनाच्या गाळात रुतलेले असून हे संकट पचवणे आता अशक्य होऊ लागले आहे. त्यातच पुन्हा महाराष्ट्रात कडक निर्बंध जाहीर करण्यात येणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच याबाबत स्पष्ट सांगितले आहे.
कोरोनाचे रुग्ण रोज मोठ्या प्रमाणात आढळून येत असून यात दैनंदिन वाढच होत आहे त्यामुळे इच्छा नसली तरीही शासनाला नाईलाजाने निर्णय घ्यावा लागणार आहे. मुंबई आणि पुण्यात तर कोरोनाचा उद्रेक झाला आहे. जनतेच्या आरोग्याची काळजी म्हणून राज्याला निर्बंध लावण्याची वेळ आता आलेली आहे. राज्यात लॉकडाऊन लागणार नाही असे आरोग्य मंत्री राजेश टोपे सांगत आहेत पण अन्य मंत्री वेगळेच संकेत देत आहेत त्यामुळे जनतेत संभ्रम आहे. त्यात केंद्र सरकराने नियम घालून दिलेले आहेत त्यामुळे राज्य शासनाला केंद्राचे नियम पाळावेच लागणार आहेत. कडक निर्बंध लावले जातील असे शासनातील सर्वच मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे निर्बंध कडक होणार हे निश्चित आहे.
आज सकाळी ९ वाजता मुख्यमंत्र्यांसमवेत कोरोना विषयावर महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती कालच उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राज्य सरकारने काही निर्णय घेण्याची गरज असून उद्याच्या बैठकीत संपूर्ण महाराष्ट्राच्या संदर्भात निर्बंधाबाबत विचार विनिमय करून ठरवले जाईल. मुख्यमंत्री आज निर्बंधाबाबत निर्णय घेतील. निर्बंधाबाबत ठरताच राज्यात तसे जाहीर केले जाईल असेही पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे निर्बंधाबाबत आज फैसला होणार आहे.
राज्यात काल १८ हजार ४६६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर ओमीकरोनचे ७५ रुग्ण आढळले आहेत. २० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सद्या ६६ हजार ३०८ सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ओमीक्रोन रुग्णांची संख्या ६५३ एवढी झाली असली तरी २५९ रुग्णांनी यावर मात केली आहे हा एक दिलासा आहे. मुंबईत काल कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला आहे. मुंबईत वेगाने कोरोना वाढत आहेच पण काल एका दिवसात १० हजार ८६० नवे रुग्ण आढळून आले आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार २० हजार रुग्णांचा टप्पा गाठला की आपोआप लॉकडाऊन लागणार आहे. दिल्ली येथे तर दर शनिवारी आणि रविवारी पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुण्यात शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !