शोध स्पेशल : तुम्ही जर तासनतास टी. व्ही. च्या समोर बसून राहत असाल तर ते तुमच्यासाठी नक्की जीवघेणे ठरू शकते कारण अधिक काल सलग टीव्ही पहिल्याने शरीरात रक्ताच्या गुठळ्या होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अलीकडच्या काळात टी. व्ही. घराघरातील गरज बनली आहे, मनोरंजनाचे ते सहजसाध्य असे साधन आहे. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की ती विनाशाचे कारण बनते. काही काम नाही म्हणून उगीच टीव्ही लावून बसण्याची सवय काहीना असते तर लहान मुले कार्टून पाहत टी. व्ही. ला चिकटून बसलेली असतात. फार वेळा टीव्हीसमोर बसण्याने मानेचे स्नायू दुखावतात आणि त्यातून पुन्हा अन्य व्याधी उद्भवतात हे जवळपास सगळ्यांना माहित आहेच पण अधिक काळ टीव्ही पाहिल्यामुळे रक्तात गुठळ्या निर्माण होतात ही नवी माहिती समोर आली आहे. रक्तात गुठळ्या झाल्या की हृदयापर्यंत रक्त पोहोचण्यात अडथळे निर्माण होतात आणि त्यातून हृदयविकाराचा धक्का बसू शकतो.
रक्ताच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून शास्त्रज्ञांनी टी व्ही पाहताना मध्येच काही काळ थांबावे असा सल्ला देतात. रोज चार तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ टीव्ही पहिल्याने रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका ३५ ताक्य्यानी वाढतो असे अभ्यासात आढळून आले आहे.. सलग खूप वेळ टीव्ही पहाताना मध्येच काही काळ थांबले पाहिजे तसेच शरीराची हालचाल करणे आवश्यक आहे, याशिवाय टीव्ही पाहताना अरबट चरबट काही खाण्याची अनेकांना सवय असते पण हे खाणे पूर्णपणे टाळले गेले पाहिजे. संशोधकांनी विविध अभ्यास आणि तंत्राचा वापर करून काही निष्कर्ष एकत्रित केले आहेत.
४० वर्षे वयाच्या किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या १ लाख ३१ हजार ४२१ लोकांचा अभ्यास करण्यात आला आणि या लोकांना दोन गटात विभागण्यात आले होते. दीर्घ काळ टी व्ही पाहणारा एक गात आणि क्वचित टीव्ही पाहणारा दुसरा गट तयर करण्यात आला होता. पहिल्या गटात दररोज किमान चार तास आणि दुसऱ्या गटात रोज आधीच तासांपेक्षा कमी काल टीव्ही पाहणाऱ्या लोकांचा समावेश करण्यात आला होता. या अभ्यासातून हा निष्कर्ष समोर आला आहे. त्यामुळे टीव्ही मनोरंजनाचे महत्वाचे साधन असले तरी जरा जपून ! टी. व्ही, जरूर पहां पण वेळेची मर्यादा नक्की ठेवा ! मनोरंजन आवश्यक आहेच पण आपल्या जीवनापेक्षा ते अधिक मोलाचे नाही ते नक्की !
- पंढरपूर तालुक्याला कोरोनाचा सर्वाधिक धोका !
- नवजात बालकाला फेकले कडाक्याच्या थंडीत उघड्यावर !
- तरुणाची आत्महत्या ! एस टी संपामुळे आर्थिक अडचण !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !