BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ जाने, २०२२

थंडीचा कडाका आणखी वाढणार !



मुंबई : राज्यात अनेक ठकाणी पाऊस झाल्याने थंड वातावरण निर्माण झाले असताना येत्या दोन दिवसात आणखी थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान  विभागाने व्यक्त केला आहे. 


हिवाळा अखेरच्या टप्प्यात आला असताना गावेतील गारवा अधिक वाढत चालला असून तापमानात मोठी घट होत आहे. राज्यातील किमान तापमानात देखील मोठी घट होऊन थंडी वाढत आहे. त्यातच राज्यात अनेक ठकाणी पाऊस पडला असल्याने तापमानात घट होऊन हवेतला गारवा वाढला आहे. येत्या दोन दिवसात आणखी थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या थंडीचा सर्वाधिक प्रभाव मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्टात जाणवण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.   


गुजराथ आणि पाकीस्थान येहून आलेल्या जोरदार वाऱ्यासोबत आलेल्या धुळीच्या कणामुळे काल मुंबईतील अनेक भागातील हवेची गुणवत्ता कमी होऊन तो धोकादायक पातळीवर पोहोचला आणि धुलींकणामुळे दृष्यमानता कमी झाली होती. मागील दहा वर्षातील सर्वात कमी तापमानही रविवारी मुंबईत नोंदले गेले आहे. राज्यात किमान तपमानात घट होऊन पुणे, नाशिक आणि आजूबाजूच्या जिल्यात सर्वाधिक थंडी जाणवणार असल्याचा अंदाजही भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही ठिकाणी तर एक अंकी तपमान नोंदले जाण्याची शक्यता आहे.  थंडीमुळे विविध प्रकारे त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज असून विशेषत: आजारी तसेच वृद्ध नागरिकांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.
 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !