BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ जाने, २०२२

पुण्यात घातला गंडा, पंढरीत झाली अटक !

 



पंढरपूर : पुण्यात ५३ लाखांचा गंडा घालून विठ्ठलाच्या नगरीत येवून  दडलेल्या इस्लामपूरच्या एका भामट्यास पंढरीत अटक करण्यात आली असून पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 


देवाचे गाव असलेल्या पंढरीत संत सज्जनांचे पाय लागतात तशाच प्रकारे अनेक गुन्हेगार येथे येऊन आश्रय घेतात अशा काही घटना यापूर्वीही उघडकीस आल्या आहेत. करमाळा तालुक्यात पत्नी आणि मुलीचा खून करून पसार झालेला आरोपी पंढरीच्याच गर्दीत सापडला होता. असे अनेक प्रकार घडतात. पंढरीत भाविकांनी गर्दी असते,  रोज नवनवे हजारो भाविक येतात यामुळे येथे कुणाला शंका येणार नाही आणि कुणी ओळखू शकणार नाही असा आरोपींचा एक गैरसमज असतो पण पोलीस या गर्दीतूनही बरोबर हेरतात आणि बेड्या ठोकतात. पुण्यात लाखोंचा गंडा घालून पळालेल्या इस्लामपूर येथील एका आरोपीला देखील असाच पंढरीत पकडण्यात आले आहे. 


शेअर मार्केट मधील गुंतवणुकीवर दहा ते वीस टक्के परतावा आणि रक्कम दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत ५३ लाख ९ हजार ९९४ रुपयाला गंडा घातल्याचा आरोप असलेला सुमेध जोशी याच्या मागावर पुणे पोलीस होते. पुण्याच्या हिंजवडी  पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील मेघनसिंह अमरसिंग पाटील यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सुमेध जोशीसह त्याची पत्नी साक्षी जोशी हिच्यावर देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे.  या दोघांनी आपसात संगनमत करून शेअर मार्केट मध्ये रक्कम गुंतविल्यास  पंधरा दिवस ते एक महिना मुदतीत दहा ते वीस टक्के परतावा देतो आणि रक्कम दामदुप्पट करून देतो अशा बतावण्या मारल्या. पाटील यांना विश्वासात घेत त्यांच्याकडून ५३ लाख ९ हजार ९९४ एवढी रक्कम घेतली पण प्रत्यक्षात ठराविक दिवसात ठरल्याप्रमाणे मोबदला दिला नाही. पाटील यांच्या नावाने एकही शेअर खरेदी केला नसल्याचे दिसून आले. शिवाय दामदुप्पट रक्कम देखील दिली नाही त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आले.


फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यानंतर पाटील यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि सुमेध जोशी (रा. मंत्री कॉलनी, इस्लामपूर ) आणि त्याची पत्नी साक्षी जोशी (चिंचवड, पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी सुमेध जोशी हा हिंजवडी पोलिसांना पुढील तपासासाठी हवा होता परंतु तो पुण्यात सापडला नाही. पोलिसांनी माहिती काढली  तेंव्हा तो पंढरपूर येथे असल्याचे त्यांना धागेदोरे लागले आणि त्यानुसार त्याला पंढरपूर येथून अटक करण्यात आली. 


वाचा >> >> पंढरपूर - बाभूळगाव रस्त्यावर अपघात, एक ठार !   

पंढरीत महिला अधिकाऱ्यांची चोरली दुचाकी !

      





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !