पंढरपूर : दुचाकी चोरीचे प्रकार किंचितही कमी होताना दिसत नसून इसबावी येथून आणखी एका दुचाकीची चोरी झाल्याची घटना पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
पंढरपूरच नव्हे तर, राज्याच्या प्रत्येक तालुक्यात रोज मोटार सायकल चोरीच्या घटना घडत आहेत. पोलीस अशा दुचाकीस्वारांना पकडून त्यांचाकडून मोठ्या प्रमाणात दुचाकी जप्तही करीत आहेत आणि गुन्हा दाखला करून त्यांना गजाआड पाठवत आहेत. पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तरी दुचाकी चोरीच्या प्रकार किंचितही कमी होताना दिसत नाहीत. दुकाने तसेच रात्री घरासमोर लावलेली दुचाकी चोरी होतात त्यामुळे दुचाकी धारक सतत काळजीत असतात. दुकानासमोर गाडी लावून काही खरेदी करण्यासाठी दुकानात जाऊन परत येताच आपली गाडी चोरीला गेल्याचे दिसून येते, रुग्णालयात आजारी व्यक्तीची भेट घेऊन परत येईपर्यंत बाहेर उभी केलेली दुचाकी गायब झालेली असते. एवढेच काय, रात्री दारात उभी केलेली दुचाकी सकाळी जागेवर आढळत नाही. त्यामुळे दुचाकी वापरणे कठीण झाले असून ती गरजेचीही आहे त्यामुळे नागरिक अस्वस्थ असतात.
दुकाने, दवाखाने आणि बँक ही गाडी हमखास चोरीला जाण्याची ठिकाणे बनली आहेत. पंढरपूर येथील इसबावीमधून अशीच एका दुचाकीची चोरी झाली आहे. बँकेत अधिकारी असलेल्या महिलेची दुचाकी दवाखान्याच्या समोरून लंपास करण्यात आली आहे. इसबावी, वाल्मिकी नगर येथे राहणाऱ्या ५६ वर्षीय जयश्री रामकिशन सोनकांबळे यांची दुचाकी चोरीला गेली आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या गुरसाळे शाखेत त्या सेवा बजावतात. इसबावी येथील एका रुग्णालयात त्यांनी डोळे तपासले आणि आपली होंडा क्लिक दुचाकी ( एम एच १३ सी वाय २६४६) रुग्णालयाच्या समोरच ठेवून त्या रिक्षाने बँकेत गेल्या होत्या. नातेवाईक आजारी असल्याची माहिती मिळाल्याने त्या तशाच सोलापूरला गेल्या. दहा दिवसांनी त्या परत इसबावी येथे आल्या असता त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपली २८ हजार रुपये किमतीची मोटार सायकल चोरीस गेल्याची फिर्याद त्यांनी पंढरपूर शहर पोलिसात दिली आहे.
वाचा >> येथे क्लिक करा >> पंढरपूर - बाभूळगाव रस्त्यावर अपघात, एक ठार !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !