BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ जाने, २०२२

सोलापूरच्या महिला डॉक्टरला भामट्यांचा गंडा !

 




सोलापूर : सैन्यातील अधिकारी असल्याचे भासवून सोलापूर येथील एका महिला डॉक्टरांना पावणे दोन लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अलीकडे सर्रास आणि हातोहात ऑनलाईन गंडा घालून मोठ्या रकमेची टोपी घातली जाते. सतत अशा घटना घडत असतानाही उच्च शिक्षित मंडळीही या भामटेगिरीला फसताना दिसतात. आपण सैन्यातील अधिकारी आहोत असे भासवत सोलापुरातील एका महिला डॉक्टरांना हातोहात फसविण्यात आले आहे. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे आणि त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  पुण्यातील फ्लॅट भाड्याने घेण्यासाठी डिपॉझिट रक्कम ट्रान्स्फर करण्याचा बहाणा करीत या महिला डॉक्टरांना १ लाख ७४ हजाराला फसविले आहे.  सोलापूर येथील आसरा चौकातील सुरवसे मित्र नगर येथे राहणाऱ्या डॉ. प्रियांका मारुती करडे यांची अज्ञात भामट्याने ही फसवणूक केली आहे. 


डॉक्टरांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा पुण्याच्या वडगाव शेरी येथे एक फ्लॅट आहे आणि तो त्यांना भाड्याने द्यायचा होता. डॉ. प्रियांका या आपल्या वडिलांच्या सोबत दुचाकीवरून निघालेल्या असतानाच त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला आणि फोनवर बोलण्यासाठी त्यांनी त्यांची दुचाकी मोकळ्या जागेत उभी केली. त्यांनी मोबाईल पहिला असता ९३९५४६९३२० या क्रमांकावरून हा फोन आलेला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव विकास राजनाथ पाटील असे असून आपण आर्मी ऑफिसर असल्याचे सांगितले. डॉ. प्रियांका यांनी त्याच्याशी फोनवरून चर्चाही केली. आपल्या फ्लॅटसंदर्भात आपल्या वडिलांशी बोलणे झाले असल्याचेही या व्यक्तीने सांगितले. 


आपला फ्लॅट भाड्याने घ्यायचा आहे,  त्यासाठी डिपॉझिटची रक्कम तुम्हाला द्यायची आहे. तुम्हाला डिपॉझिट रक्कम ट्रान्स्फर करायची असल्यामुळे तुम्ही ९० हजार रुपये पाठवा, मी तुम्हाला रक्कम परत ट्रान्सफर करतो असे सांगितले. डॉक्टर प्रियांका यांनीदेखील त्याच्या म्हणण्यानुसार वेगवेगळ्या दोन खात्यामधून १ लाख ७४ हजार रुपये रक्कम त्याला ट्रान्सफर केली. पण त्यांना डिपॉझिटची रक्कम मिळालीच नाही. शंका आल्याने त्यांनी संबंधित खाती आणि मोबाईल क्रमांक तपासाला तेंव्हा आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि मग त्यांनी पोलिसात धाव घेऊन या तोतया आर्मी ऑफिसरच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. कुणाचातरी अनोळखी व्यक्तीचा फोन येतो आणि उच्च शिक्षित असलेल्या डॉक्टर थेट एवढी मोठी रक्कम ट्रान्सफर करतात याचे मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे.    


हे वाचाच :> भैया देशमुख यांनी घेतली पोलीस निरीक्षकाची 'विकेट' ! 








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !