इंदूर : अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी पलक हीच मुख्य सूत्रधार म्हणून समोर आली असून महाराजांना पागल बनविण्यासाठी तिने तांत्रिकाला २५ लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची बाब उघड झाली होती.
भय्यू महाराज यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या तिघांना सहा वर्षाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे पण या घटनेतील एकेक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. भय्यू महाराज यांनी आपले सेवादार विनायक दुधाळे, चालक शरद देशमुख आणि पलक यांच्यावर मोठा विश्वास दाखवला होता. अखेर या तिघांची त्यांचा घात केला असल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकरणात पलक ही मास्टर माइंड असल्याचे उघड झाले आहे. केवळ पैशासाठी या तिघांनी मोठे कुभांड रचले होते आणि त्या तणावातून भय्यू महाराज यांनी टोकाचे पाउल उचलले होते. भय्यू महाराज यांना मनोरुग्ण बनविण्याचे कारस्थान पलक हिने रचले होते ही बाब पुढे आली आहे. त्यांना मनोरुग्ण बनविण्यासाठी पलक हिने एका तांत्रिकाला २५ लाख सुपारी दिली होती अशी माहिती तपासात आढळून आली असल्याचे सांगितले जात आहे.
पोलीस तपासात पलक हिच्या मोबाईलमधील व्हाटस ऍप चॅट पोलिसांच्या हाती लागले होते. यात 'जीजू' शी चॅट करताना 'बीएम को पागल बनाकर घर मे बिठाना है, तांत्रिक को २५ लाख की सुपारी दी है' असे म्हटल्याचे उघड झाले होते. भय्यू महाराज यांच्यासाठी 'बीएम' हा कोड वार्ड वापरण्यात येत होता. या चॅटच्या आधारेच इंदूर पोलिसांनी भक्कम पुरावे गोळा केले होते. भय्यू महाराज यांच्याशी लग्न करून त्यांच्या संपत्तीची मालक होण्याचा कट देखील पलक हिने आखला होता यासंबंधीचे पुरावे देखील पोलिसांच्या हाती लागले होते अशी माहिती मिळत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी पलक हिने भय्यू महाराज यांच्यासोबत काही अश्लील व्हिडीओ बनवले होते आणि त्याचा आधार घेत ती सेवकांच्या मार्फत महाराजांना ब्लॅकमेल करीत होती. तिने लग्नासाठी देखील भय्यू महाराज यांच्यावर दबाव निर्माण केला होता. त्यांच्या कट कारस्थानाला कंटाळून भय्यू महाराज यांनी आत्महत्या केली होती. शिक्षा झालेले तीनही आरोपी मिळून महाराजांची संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न करीत होते. या तीनही आरोपीना सहा वर्षांची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे पण गेल्या तीन वर्षांपासून हे तीन आरोपी तुरुंगातच होते आणि हा काळ देखील याच शिक्षेत मोजला जाणार असल्याने आणखी तीन वर्षांनी हे तीनही आरोपी बाहेर येतील.
पलक नावाची ही महिला संपत्तीसाठीच महाराज यांच्या जीवावर उठली होती. गोड चेहऱ्याची ही पलक अत्यंत खतरनाक होती. योजना आखून तिने भय्यू महाराज याना ब्लँकमेल तर केलेच आणि त्याच्या अंधारातून तिने आश्रमाच्या तिजोरीवर आणि दानपेटीवर कब्जा मिळवला होता. एवढेच नव्हे तर भय्यू महाराज यांच्या घराच्या चाव्या देखील तिने आपल्याकडे घेतल्या होत्या. लोकांसमोर ती महाराजांची मुलगी असल्याचा आभास निर्माण करायची पण महाराजासोबत ती प्रेयसी असल्याप्रमाणे वागत होती. पलक आणि तिचा साथीदार विनायक प्रत्येक महिन्याला महाराजांकडून दीड लाखांची रक्कम वसूल करीत होते. महाराज आणि पलक हिचे अनेक अश्लील फोटो वापरून ब्लॅकमेल केले जात होते आणि यातून महाराज खचले होते त्यामुळे त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. ही सर्व माहिती नंतर समोर आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !