टेंभुर्णी : सोलापूर - पुणे महामार्गावर आणखी एक अपघात होऊन झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना घडली आहे. उजनी पाटीजवळ पिकअप आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला.
इंदापूरकडून अनिल सुशील देवकर हा २० वर्ये वयाचा तरुण दुचाकीवर टेंभूर्णीच्या दिशेने येत असताना समोरून उजनी येथून केली घेऊन येत असलेल्या पिकअप ने समोरून जोराची धडक दिली. या धडकेत अनिल याच्या डोक्याला जबर मार लागला आणि तो जागीच ठार झाला. ही धडक होताच केळी घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाला आणि या पिकअप टेम्पो पलटी झाला. या टेम्पोत बसून निघालेला अब्दुल मफ़ू शेख हा टेम्पोतून खाली पडला आणि याच टेम्पोच्या खाली सापडला त्यामुळे तो देखील टेम्पोखाली दाबून मृत्युमुखी पडला. त्यामुळे या अपघातात दोघे जण ठार झाले. दुचाकीवरील अनिल सुशील देवकर हा करमाळा तालुक्यातील कंदर येथील असून अब्दुल हा माढा तालुक्यातील आढेगाव येथील आहे. अब्दुल शेख हा मजूर असणं तो मूळ राहणार पश्चिम बंगाल मधील मालदा जिल्ह्यातील आहे. या अपघातावेळी पिकअप टेम्पो हा रस्त्यावरून दुभाजकाच्या बाजूला जाऊन पलटी झाला एवढा हा अपघात भीषण होता.
भरधाव वेगाने जाणारा पिकअप दुचाकीला एवढ्या जोरात धडकला की तो लगेचच बाजूला जाऊन पलटी झाला. अपघात होताच पिकअप चालक तेथून पळून गेला. अपघात ग्रस्तांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले परंतु त्यांचा आधीच मृत्यू झाला होता त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !