पंढरपूर : रेल्वेत नोकरी लावतो म्हणून पंढरीतील काही जणांना लाखो रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी महिलेसह अन्य आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
रेल्वेत नोकरी लावतो म्हणून पंढरपूर येथील संशयित आरोपी शाम कोंडीबा शेलार याने पंढरीतल काही जणांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पंढरपूर येथील पांडुरंग गणपत गायकवाड यांनी या फसवणुकीची आणि मारहाणीची फिर्याद पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेली होती. फिर्यादीनुसार शेलार याने पांडुरंग गायकवाड यांच्यासह अन्य काही जणांची आर्थिक फसवणूक केली आहे. आरोपी शेलार याने भारतीय रेल्वेत नोकरी लावतो असे सांगून प्रत्येकी ६ लाख ५० हजार रुपये घेतले. बनावट मेरीट लिस्ट आणि बनावट नियुक्तीचे स्टेट्स दाखवून दिल्ली, कोलकाता, हैद्राबाद अशा ठिकाणी अनावश्यक फिरवून आणून दिशाभूल केली. गायकवाड यांच्यासह अन्य अनेक विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रेही त्याने आपल्याकडे घेतली होती.
आरोपीने अनेकांची फसवणूक केली असल्याचे लक्षात येताच सर्वांनी रक्कम आणि कागदपत्र यांची मागणी करूनही आरोपीने काहीच परत दिले नाही. आरोपी मनीषा विलास दिघे, राजेंद्र सत्यवान घागरे, किरण ज्ञानेश्वर ननवरे, विशाल ज्ञानेश्वर ननवरे (सर्व रा, सातारा ) यांचाकडे दिलेली कागदपत्रे परत मागण्याकरिता फिर्यादी गायकवाड आणि त्यांचे अन्य साथीदार गेले असता आरोपींनी पैसे आणि कागदपत्रे देणार नाही असे सांगून मारहाण केली अशा आशयाची फिर्याद पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली. यानंतर शहर पोलिसांनी आरोपी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर यातील आरोपी मनीषा विलास दिघे, राजेंद्र सत्यवान घागरे, किरण ज्ञानेश्वर ननवरे, विशाल ज्ञानेश्वर ननवरे यांनी पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जमीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.
आरोपींनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर सरकार पक्षातर्फे हरकत घेण्यात आली. सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून आरोपींनी फिर्यादी आणि इतर लोकांकडून प्रत्येकी ६ लाख ५० हजार रुपये घेतले आहेत. त्यांना बनावट मेरीट लिस्ट आणि बनावट नियुक्ती स्टेटस दाखवून दिल्ली, कोलकाता, हैदराबाद अशा ठिकाणी फिरवून आणून दिशाभूल केली आहे. प्रत्येकाकडून घेतलेली रक्कम कोठे गुंतवली आहे हे आरोपीस माहित आहे शिवाय अशा प्रकारे आणखी किती जणांना फसवले आहे याचा तपास करणे बाकी आहे. सद्या ३० मुलांचे मूळ कागदपत्र हस्तगत करण्यात आले आहेत. अन्य पुरावे मिळालेले असून सकृतदर्शनी आरोपींचा गुन्ह्यात सहभाग आहे हे स्पष्ट होत आहे त्यामुळे अटकपूर्व जामीन देण्यात येऊ नये असा युक्तिवाद फिर्यादीच्या वकिलांनी केला आणि तो ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधिश - १ एम बी लंबे यांनी आरोपींना अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला. सरकार पक्षातर्फे ऍड सारंग वांगीकर याची आणि मूळ फिर्यादीच्या वतीने ऍड उदय बागल यांनी काम पहिले.
वाचा > १६ महिन्यांच्या मुलीवर बापानेच बलात्कार करून केला खून !
वाचा> क्लिक करा >> दोन महिन्यात कोरोनाचा सर्वनाश अटळ !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !