भविष्यवेत्ते बाबा वेंगा यांची
भविष्यवाणी
राज्यात कोरोनाचा प्रकोप सुरु असताना आणि आता तिसरी लाट समीप दिसत असतानाच नव्या वर्षात धोकादायक व्हायरस येणार असल्याची धक्कादायक भविष्यवाणी समोर आली आहे. बुल्गारीयातील भविष्यवेत्ते बाबा वेंगा यांनी ही भविष्यवाणी केली आहे.
गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन उध्वस्त झाले आहे. सगळी चाकं ठप्प झाली असून आर्थिक चक्र कोरोनाच्या गाळात रुतून बसली आहेत. कोरोना परण्याची वाट पाहत दोन वर्षे झाली पण अजूनही मोकळा श्वास घेण्याची संधी मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. कोरोना परत निघालाय असे चित्र निर्माण होत असतानाच तिसऱ्या लाटेच्या स्वरुपात तो पुन्हा येऊ घातलाय. गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले असून तिसरी लाट येण्याचे संकेत हळूहळू स्पष्ट होत चाललेले आहेत. या परिस्थितीमुळे जनता पुन्हा अस्वस्थ असून आगामी काळात आणखी काय काय विनाश होणार याची चिंता लागलेली आहे.
देश विदेशात कोरोनाने भलताच धुमाकूळ घातला आहे. भारतापेक्षा विदारक आणि चिंताजनक परिस्थितीत विदेशात आहे. दररोज लाखावर रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. ओमीक्रोनचा शिरकाव झाला आहे आणि कोरोनाचे रुग्ण रोज वाढत आहेत. लोक मृत्युमुखी पडत आहेत. कोरोना संपण्याची प्रतीक्षा असतानाच आता पुन्हा कोरोनाचा दुसरा प्रकार प्रकाशात आला आहे. कोरोना पाठोपाठ फ्लोरोना नावाचा विषाणू आढळून आल्याने विदेशात चिंता व्यक्त होत असून हा कोरोना भविष्यात काय करतोय याची चिंता सतावत असतानाच बुल्गेरीयाचे भविष्यवेत्ते बाबा वेंगा याची भविष्यवाणी समोर आली आहे. अर्थात अशा भविष्यवाणीवर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण या बाबाच्या अनके भविष्यवाणी या तंतोतंत सत्यात उतरले आहेत.
बाबा वेंगा यांना बाल्कन प्रदेशातील नास्ट्राडेमस मानले जाते एवढी त्यांची भविष्यवाणी अचूक समजली जाते. १९११ मध्ये जन्मलेल्या या बाबाचा मृत्यू १९९६ साली झाला आहे. त्यांच्या वयाच्या १२ व्या वर्षी आलेल्या भयानक वादळात त्यांची दृष्टी गेली होती पण आपण भविष्य पाहू शकतो ही देणगी देवाने आपल्याला दिली आहे असा त्यांचा दावा होता. त्यांनी स्वतःच्या मृत्यूचीही भविष्यवाणी केली होती आणि ती खरी ठरली होती. अमेरिकेतील ९/११ च्या हल्ल्यापासून सुनामीपर्यंत केलेल्या सर्व भविष्यवाणी सत्यात उतरलेल्या आहेत. त्यांनी केलेल्या अनेक भविष्यवाणी सत्य ठरलेल्या असून मृत्यू होण्यापूर्वी बाबाने सण ५०७९ शाळांपर्यंत भविष्यवाणी करून ठेवलेली आहे. यात २०२२ सालाची भविष्यवाणी समाविष्ठ आहे. २०२२ च्या नववर्षात धोकादायक व्हायरस येणार असून २०२२ ,मध्येच पृथ्वीवर एलियन हल्ला करू शकतात. टोळधाडीमुळे भारतात उपासमारीची वेळ येऊ शकते असेही त्याने सांगितलेले आहे.
संशोधकांना सायबेरियात एक विषाणू सापडेल, हा विषाणू अत्यंत घातक असेल, हवामानाच्या बदलामुळे बर्फ वितळेल आणि हा विषाणू पसरेल. यानंतर जगभरातील परिस्थिती अनियंत्रित होईल. २०२२ मध्ये भयंकर नैसर्गिक आपत्ती येईल आणि जगात भूकंप, सुनामी येण्याचीही शक्यता आहे. ऑस्ट्रेलिया तसेच अनेक आशियाई देशात धोकादायक पूर येईल आणि सुनामीमुळे शेकडो लोकांचा बळी जाईल अशी भविष्यवाणी या बाबाने केली आहे. भारतातील पिकांवर टोळधाड येईल आणि त्यामुळे भारतात उपासमार होईल. त्याच वेळी एलियन्स ओमुआमुआ नावाचा एस्टरॉयड पृथ्वीवर पाठवतील अशी भविष्यवाणी त्याने केलेली आहे. सन ५०७९ साली संपूर्ण जगाचा अंत होणार असल्याचीही त्याची भविष्यवाणी आहे.
आणखी वाचा :>> विठ्ठलाच्या दारात राजकीय राडा, खरे कोण, खोटे कोण ?
( हे केवळ माहितीसाठी दिले असून आम्ही अंधश्रद्धेचे कसल्याही प्रकारे समर्थन करीत नाही. हे सर्वकाही सत्य आहे किंवा असेल असा दावाही करीत नाही. उलट अंधश्रद्धेच्या आहारी कुणीही जाऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !