BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ जाने, २०२२

आता अवघड झालं ! आधी कोरोना आणि आता फ्लोरोना !!

 




मुंबई : कोरोनाने जगाला हैराण केलेले असताना आता कोरोनाच्याही पुढचा विषाणू फ्लोरेना विषाणू समोर आला असून हा विषाणू कोरोना आणि इन्फ़्लुएन्झाचे डबल इन्फेक्शन आहे त्यामुळे आता जगाची  चिंता कमी होण्यापेक्षा वाढीलाच लागू लागली आहे.  

संकटं आली की ती कधी एकटी येत नाहीत, यातना आपल्या सग्या सोयऱ्याना सोबत घेऊन येतात असं म्हणतात ते कोरोनाने शंभर टक्के खरं करून दाखवलं आहे. आधी कोरोना आला, त्याने मानव जातीचं जगणं कठीण केलं आणि अजूनही त्याचे प्रताप सुरूच आहेत. कोरोनाच्या आड दडून डेल्टा व्हेरीएंट आला, हा डेल्टा कसा आहे हे कळण्याआधीच ओमीक्रॉनची चाहूल लागली आणि पुन्हा एकदा सगळ्याच देशांची झोप उडवली. कोरोनाच्या या नव्या अवताराशी कसे लढायचे हे समजण्याआधीच आता दुसरा शत्रू आल्याची चाहूल लागली आणि 'आता खरंच अवघड झालं !' असं म्हणायची वेळ येऊन ठेपली आहे. 


कोरोनाच्या नंतर आता त्याचाच कुणी सगा सोबती फ्लोरोना या विषाणूने  शिरकाव केला असून इस्राईलमध्ये या फ्लोरोनाचा  आढळून आला आहे. हा फ्लोरोना म्हणजे कोरोना आणि इन्फ्लुएंझाचं डबल इन्फेक्शन आहे. भारतात अजून पहिला डोस सगळ्यांनी घेतलेला नसताना इस्राईल मध्ये चार महिन्यांपूर्वी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा चौथा डोस दिला होता पण आता  चौथ्या बूस्टर डोसला परवानगी देण्यात आली आहे. इस्राईलमध्ये ओमीक्रॉन अत्यंत वेगाने वाढत असल्याने सरकारने कमकुवत असलेल्या लोकसंख्येला चौथ्या बूस्टर डोससाठी परवानगी दिली आहे. आत्तापर्यंत इस्राईलमध्ये कोरोनाचे १३ लाख ८० हजार ५३ रुग्ण आढळले आहेत आणि ८ हजाराहून अधिक लोकांचे प्राण गेलेले आहेत. सद्या २२ हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार सुरु आहेत.   


हे जरूर वाचा >> क्लिक करा>> सोलापूर जिल्ह्यात कोरोनाची सर्वाधिक वाढ !  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !