BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ जाने, २०२२

दहावीच्या विद्यार्थिनीला शाळेतून पळविण्याचा डाव उधळला !

 



सांगोला : दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला तिच्या वर्गातून बोलावून तिला पळवून नेण्याचा थरारक प्रकार सांगोला तालुक्यात घडला असून मुलीचे प्रसंगावधान राखून स्वत:ची सुटका करून घेतली आहे. सांगोला तालुक्यात या घटनने खळबळ उडाली आहे. 


अलीकडे घरातील महिला  सुरक्षित नाहीत याची साक्ष देणाऱ्या घटना सातत्याने घडत असताना शाळेतून मुलाला पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुली शाळेत जाताना पालक तिला सुरक्षेसाठी शाळेपर्यंत पोहोचवतात. एकदा मुलगी शाळेच्या आवारात गेली की ती पूर्ण सुरक्षित आहे असे समजले जाते. शाळा- महाविद्यालयाच्या रस्त्यावर आणि बाहेरही सडक सख्याहरी टपून बसलेले असतात. रस्त्यावरून मुलगी चालली की जमेत त्या पद्धतीने तीही छेड काढली जाते त्यामुळे मुली शाळेत जायलाही घाबरू लागल्या आहेत. रस्त्यारस्त्यावर फुकटे हिरो गुटख्याचे तोबरे भरून हेच धंदे करीत उभे असतात त्यामुळे मुलीना बाहेर पडणे कठीण होत आहे. शाळा महाविद्यालयाच्या मार्गावर देखील असेच चित्र असते त्यामुळे मुलीना मोकळा श्वास घेणे कठीण बनले आहे. आता तर शाळेच्या वर्गातून पळवून नेण्यापर्यंत मजल गेली असल्याची साक्ष देणारी धक्कादायक घटना सांगोला तालुक्यात घडली असून याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


दहावीत शिकणारी एक मुलगी आपल्या शाळेत गेलेली असताना तिच्या वडिलांचा अपघात झाला आहे अशी बतावणी करून तिला पळवून नेण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला पण मुलीच्या धाडसामुळे हा डाव उधळला गेला आहे. सांगोला तालुक्यातील एका शाळेत ही मुलगी असताना धनाजी ठोंबरे हा आपल्या मित्रासह या शाळेत गेला आणि त्याने मुख्याध्यापकांना खोटी बतावणी केली. सदर मुलीच्या वडिलांचा अपघात झाला आहे असे सांगून त्या मुलीला नेण्यासाठी आल्याची थाप त्यांनी मारली. मुख्याध्यापकांनी शिपायाच्या मार्फत त्या मुलीला वर्गातून बोलावून आणले आणि  या दोघांच्या सोबत पाठवून दिले.  दोघांनी या मुलीला दुचाकीवरून नेले परंतु शाळेच्या शिपायाला काही शंका आल्याने त्याने थेट मुलीच्या वडिलांच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्यांचा अपघात वगैरे काही झाला नसल्याची माहिती शिपायाला मिळाली आणि एकूण प्रकार शिपायाच्या लक्षात आला. 


शाळेच्या शिपायाने मुलीच्या वडिलास सर्व कल्पना दिली आणि धनाजी ठोंबरे आणि त्याच्या साथीदाराचे नाव देखील सांगितले. मुलीच्या वडिलांनी लगेच या धनाजीला फोन केला असता आपण मोटार सायकल चालवत आहोत असे सांगून फोन कट केला. वेगळ्याच  रस्त्याने चाललेली मोटार सायकल पाहून मुलीने 'इकडे कुठे निघालो आहोत?' अशी विचारणा केली तेंव्हा दवाखान्याच्या खर्चासाठी घरून पैसे घेवून जायचे आहेत अशी बतावणी त्याने केली.  सोबत असलेल्या मित्रास धनाजीने त्याच्या घराजवळ सोडले आणि तो मुलीला घेऊन रस्त्यावरच असलेल्या एका पाहुण्याची घरी नेले. या घरी पोहोचताच धनाजीने त्याचे रंग दाखवायला सुरुवात केली.  मुलीसोबत लज्जास्पद वर्तन करू लागला. आता मात्र या मुलीच्या लक्षात सगळा प्रकार आला होता. मुलीने आरडाओरडा सुरु केला आणि मोठ्या हिमतीने त्याच्या हाताचा चावा घेत तिने आपली सुटका करून घेतली. 


दरम्यान गावातील काही या घरी पोहोचले होते, त्यांच्याकडून या मुलीने मोबाईल घेतला आणि आपल्या वडिलांशी संपर्क साधला. मुलीने आपली सुटका करून घेतली आणि नंतर मुलीच्या वडिलांनी काळूबाळूवाडी येथील धनाजी ठोंबरे आणि श्रीकांत हाके यांच्याविरोध्त पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  शाळेत जाऊन मुख्याध्यापकाला थाप मारून या दोघांनी हा प्रकार केला पण काही काळेबेरे असल्याचा संशय शाळेच्या शिपायाला आला. मुलीनेही धाडस दाखवत आपली सुटका करून घेतली पण शाळेतील मुलीही आता सुरक्षित नाहीत हेच या घटनेतून समोर आले आहे. 


________________

लतादीदी सुखरूप !


गानकोकिळा लता मंगेशकर यांच्याबाबत आज एक चांगली बातमी बाहेर आली असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती देण्यात आली आहे. मंगेशकर यांना कोरोनाची बाधा झाली असून सोबत त्यांना न्यूमोनियाचा त्रासही होत आहे. त्या उपचार घेत असून त्यांच्या प्रकृतीबाबत रोज अनधिकृत माहिती बाहेर येत होती आणि अफवा पसरल्या जात होत्या पण आज त्यांच्या निकटवर्तीय अनुषा अय्यर यांनी ताजी माहिती दिली आहे. लतादीदींच्या प्रकृतीत काल रात्रीपासून सुधारणा होताना दिसत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. डॉक्टर काळजीपूर्वक त्यांच्यावर उपचार करीत असून उपचाराला त्या प्रतिसाद देत आहेत अशी माहिती अनुषा अय्यर यांनी दिली आहे.  फार सुधारणा नसली तरी काही अंशी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

   

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !