BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० जाने, २०२२

भीषण अपघातात पाच जण जागीच ठार , कारचा चक्काचूर !

 



लोणावळा : मुंबई - पुणे महामार्गावर आज झालेल्या भीषण अपघातात पाच जन जागीच ठार झाले असून अपघातातील कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. अंगावर काटा आणणारा हा अपघात आज सकाळी शिलाटणे गावाजवळ झाला.


मुंबई- पुणे महामार्गावर आजची सकाळ अत्यंत भयावह उगवली. कंटेनर आणि कार यांच्यातील हा अपघात अंगावर काटा आणणारा होता. मुंबईकडून पुण्याचे दिशेने निघालेली कार भरधाव वेगात येत होती. कार अत्यंत वेगात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ही कार रस्ता दुभाजक ओलांडून पलीकडच्या दिशेला गेली. एवधावरच हा प्रकार थांबला नाही तर त्या रस्त्यावरून समोरून येत असलेल्या कंटेनरच्या खाली जाऊन कार घुसली. कंटेनरच्या खाली वेगातील कार गेल्याने कारचा अक्षरश: चुराडा झाला असून अपघात पाहणाऱ्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकत होता. 


या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांची ओळख पटलेली नाही. हे ओळख पटविण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत. अपघाताची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातग्रस्त कारचा क्रमांक एच आर २६ के ७८०५ असा असून यातील प्रवासी नक्की कोण होते याची माहिती पोलीस  मिळवत आहेत. दोन्ही अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या मदतीने बाजूला कडून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !