लातूर : आपल्या १३ वर्षीय मुलीला शाळेत घेऊन निघालेला शिक्षकाचा मुलीसह अपघाती मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना आज घडली आणि बापलेकीच्या मृत्यूने अवघे लातूर हळहळले !
अलीकडे दररोज प्रत्येक शहराच्या आजूबाजूला अपघात घडत आहेत आणि कुणाचे न कुणाचे बळी जात आहेत. लातूर शहरातील एका अपघाताने तर प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले दत्तात्रय पांचाळ हे आपल्या १३ वर्षाच्या मुलीस, प्रतीक्षाला घेऊन शाळेकडे निघाले होते. दुचाकीवरून ते जात असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक मारली आणि या अपघातात बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्हा परिषद शिक्षक दत्तात्रय पांचाळ (वय ३८) हे लातूरच्या भुसणी येथे राहत असून त्यांची तेरा वर्षे वयाची मुलगी प्रतीक्षा ही लातूरच्या ज्ञाजेश्वर इंग्लिश स्कूलमध्ये आठवीत शिकत होती.
शिक्षक पांचाळ हे दररोज प्रतीक्षाला शाळेत सोडून पुन्हा पानचिंचोली येथे त्यांच्या शाळेत जाऊन ज्ञानदानाचे काम करीत होते. रोजच्या सवयीप्रमाणे आजही ते प्रतीक्षाला घेऊन शाळेत निघाले होते परंतु म्हाडा वसाहतीच्या जवळ अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली आणि या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेने लातूर जिल्हा हळहळला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !